सर्वात जास्त धरणे असूनही महाराष्ट्रात ९० टक्के पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:22 AM2021-01-09T04:22:39+5:302021-01-09T04:22:39+5:30
मिरजेत महापालिकेतर्फे आयोजित जलशक्ती अभियानात फडके यांनी मार्गदर्शन केले. महापालिकेचे सहायक आयुक्त दिलीप घोरपडे अध्यक्षस्थानी होते. फडके म्हणाले, ...
मिरजेत महापालिकेतर्फे आयोजित जलशक्ती अभियानात फडके यांनी मार्गदर्शन केले. महापालिकेचे सहायक आयुक्त दिलीप घोरपडे अध्यक्षस्थानी होते.
फडके म्हणाले, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलव्यवस्थापनाची आवश्यकता आहे. पावसाचे पाणी साठवून ते जिरवणे, पाणी साठवून व त्याचा पुनर्वापर व्यवस्थित करावा लागणार आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत समाजाला पटवून देण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ओलाचिंब देश भारत असून, वापरण्यायोग्य दीड टक्केच पाणी भारतात आहे. भारतातील वापरण्यायोग्य नऊ टक्के पाणी एकट्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात पाणी भरपूर प्रमाणात असून, हे पाणी काळजीपूर्वक वापरले तर पाणीटंचाई रोखता येऊ शकते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यमुना चिकोडे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘मी मिरजकर’ फाऊंडेशन''तर्फे मनोहर कुरणे, अमोल सूर्यवंशी व संजय सूर्यवंशी यांनी संयोजन केले.
फाेटाे : ०८ मिरज २
ओळ : मिरज येथे महापालिकेतर्फे आयाेजित जलशक्ती अभियानाचे उद्घाटन प्रा. रवींद्र फडके यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी दिलीप घाेरपडे, यमुना चिकाेडे, मनाेहर कुरणे, आदी उपस्थित हाेते.