इस्लामपूर नगरपालिकेत संख्याबळ असूनही राष्ट्रवादीचे सदस्य हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:43 PM2017-11-02T23:43:06+5:302017-11-02T23:48:03+5:30

 Despite the incompetence in Islampur Municipality, NCP member Hatabal | इस्लामपूर नगरपालिकेत संख्याबळ असूनही राष्ट्रवादीचे सदस्य हतबल

इस्लामपूर नगरपालिकेत संख्याबळ असूनही राष्ट्रवादीचे सदस्य हतबल

googlenewsNext
ठळक मुद्देसत्ताधारी आघाडी वरचढ : आक्रमकताही हरविल्याचे चित्रसत्ताधारी आघाडी वरचढ : आक्रमकताही हरविल्याचे चित्रएका स्वयंघोषित युवा नेत्याची लुडबूड वाढली

अशोक पाटील।
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जादा असूनही सत्ताधारी विकास आघाडीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यापुढे राष्ट्रवादीचे सभापती आणि नगरसेवक हतबल झाले आहेत. त्यामुळे पालिकेशी सुतराम संबंध नसलेलेही राष्ट्रवादीला भीती दाखवू लागले आहेत.
पालिकेशी संबंध नसलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आरोग्य सभापती डॉ. संग्राम पाटील यांच्याविरुध्द विरोधी विकास आघाडीचे कान भरले. पालिका प्रशासनाला हाताशी धरून डॉ. पाटील यांच्या रुग्णालयाची झडती घेतली. यामध्ये ठेकेदाराने ठेवलेली जुनी वीज उपकरणे सापडली. हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. परंतु हे प्रकरण कायद्याच्या चाकोरीत बसत नसल्याने, पोलिसांनीच गुन्हा नोंद करण्यास नकार दिला. यावेळी गटनेते संजय कोरे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती, तर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत आक्रमकता दिसली नाही.
राष्ट्रवादीतून विकास आघाडीत पाहुणे म्हणून आलेले निशिकांत पाटील पालिकेत कारभारी होऊन बसले आहेत, पण विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांची नाराजी प्रकर्षाने जाणवते. ते नाराजीतूनच पालिकेतील कारभार हाकत आहेत. त्यांच्यासाठी खास बैठक व्यवस्थाही करण्यात आली आहे. परंतु त्यांचे तेथील दर्शन दुर्मिळ झाले आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधी गटातील दादासाहेब पाटील यांना उपनगराध्यक्षाचा मान दिला आणि इस्लामपूर पालिकेत आमचीच सत्ता आली, म्हणून टिमकी वाजवली. परंतु लोकनियुक्त नगराध्यक्षांपुढे राष्ट्रवादीची डाळ शिजत नाही. गेल्या नऊ महिन्यातील सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधी राष्ट्रवादीची कार्यपद्धत दिसली आहे. सभागृहावर पकड आणण्यासाठी नगराध्यक्ष पाटील विरोधकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार देत आहेत. तो राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहन करत आहेत. सभागृहात मूग गिळून गप्प बसायचे आणि बाहेर बोलबच्चनगिरी करायची, ही राष्ट्रवादीची कार्यपद्धत अंगलट येऊ लागली आहे. याचाच फायदा पालिकेशी संबंध नसलेले कार्यकर्ते उठवू लागले आहेत. सध्या शहरात सुरू असलेली किरकोळ विकासकामे म्हणजे ‘जुन्या भांडवलावर व्याज खाणे’ असा प्रकार आहे. त्यामध्येही सत्ताधारी आणि विरोधकांत तू-तू मै-मै सुरू आहे.

स्वयंघोषित युवा नेत्याची लुडबूड
पालिकेत विकास आघाडीच्या नगरसेवकांचे बगलबच्चे यांची चलती आहे. बहुतांशी नगरसेवकांचे बगलबच्चेच पालिका वर्तुळात वावरताना दिसतात. पालिका प्रशासनाच्या कारभारात सध्या एका स्वयंघोषित युवा नेत्याची लुडबूड वाढली आहे. त्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक न्यायालयाच्या माध्यमातून अद्दल घडविण्याच्या तयारीत आहेत.

Web Title:  Despite the incompetence in Islampur Municipality, NCP member Hatabal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.