शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र आटपाडीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:44+5:302021-07-09T04:17:44+5:30
आटपाडी : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र थोर साहित्यिकांची परंपरा लाभलेल्या आणि मुबलक जागा उपलब्ध असलेल्या आटपाडी येथे उभारावे, अशी ...
आटपाडी : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र थोर
साहित्यिकांची परंपरा लाभलेल्या आणि मुबलक जागा उपलब्ध असलेल्या आटपाडी येथे उभारावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष
अमरसिंह देशमुख यांनी पालकमंत्री
जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. पालकमंत्री पाटील यांना निवेदनही दिले आहे.
निवेदनात म्हटले की, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र बस्तवडे येथे उभारण्यास विरोध आहे. त्यानंतर पेड आणि नंतर
खानापूरला उपकेंद्र व्हावे, अशी
मागणी होत आहे. आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, डॉ. शंकरराव
खरात, ना. स. इनामदार यांच्यासारख्या
थोर साहित्यिकांची मोठी परंपरा
आहे. आटपाडीतून महामार्ग जात
असल्यामुळे वाहतुकीचीही चांगली
सोय आहे. तसेच विद्यापीठाचे उपकेंद्र
उभारणीसाठी अपेक्षित असलेली
गायरान जागाही उपलब्ध आहे.
आटपाडी हे ठिकाण सातारा, सांगली आणि
सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर
वसलेले आहे. तिन्ही जिल्ह्यांतील
महाविद्यालयांच्या मध्यवर्ती ठिकाण येते. सकारात्मक विचार करून आणि वादात वेळ न घालवता आटपाडीत विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यास मंजुरी
द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.