लहान मुलांची बिघडतेय तब्येत; ओपीडीमध्ये दुप्पट वाढ...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:30 AM2021-08-21T04:30:21+5:302021-08-21T04:30:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शरद जाधव/सांगली : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात अद्यापही कायम असतानाच, तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शरद जाधव/सांगली : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात अद्यापही कायम असतानाच, तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्गाची शक्यता असलीतरी आतापासूनच लहान मुलांची तब्येत बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. शासकीय रुग्णालयातील ओपीडीत बालरुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.
लहान मुलांमध्ये सध्यातरी कोरोनाचे प्रमाण कमी असलेतरी डेंग्यूचा डंख मुलांना सहन करावा लागत आहे. याशिवाय सर्दी, तापस, कणकण अशी कोरोनाशी संबंधित लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांमध्ये कोरोनापेक्षा ‘पोस्ट कोविड’ आव्हान अधिक असून, एमआयएसी सिंड्रोमचा धोका आहे. त्यातच कोरोनाच्या लक्षणांमध्ये आणि व्हायरसमधील डेल्टा, डेल्टा प्लस आदी बदल मुलांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढविणारी ठरत आहेत.
चौकट
डेंग्यूचे प्रमाण वाढतेय
पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने साचून राहिलेले पाणी आणि ढगाळ हवामानामुळे डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. डेंग्यूची लक्षणे व त्यावरील उपचार, लहान मुलांना होणारा त्याचा त्रास होत आहे.
चौकट
लक्षणे असलेल्या मुलांची कोरोना चाचणी
* शासकीय रुग्णालयातील बालरोग विभागात सध्या सर्दी, ताप लक्षणे असलेल्या लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. ही लक्षणे असलेल्या सर्वांचीच कोरोना चाचणी केली जाते.
* ज्येष्ठांच्या लसीकरणाचा टक्का वाढत असल्याने कुटुंबातील ‘हर्ड इम्युनिटी’ वाढली आहे. त्याचाही चांगला परिणाम जाणवत असून, मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी जाणवत आहे.
चौकट
ही घ्या काळजी
१) लहान मुलांना गर्दीत घेऊन जाणे टाळावे, याशिवाय मास्कचा वापर नियमित करावा.
२) कोणतीही लक्षणे दिसल्यास घरातच औषधोपचार घेत बसण्याऐवजी तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
३) फ्ल्यूचे लसीकरण सुरू आहे. ते लसीकरण घेतल्यास गंभीर लक्षणे होण्याची कमी होते.
कोट
बालरोगतज्ज्ञ म्हणतात
लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण सध्यातरी कमी असलेतरी इतर लक्षणांमुळे तब्येत बिघडत आहे. पाऊस, बदलते वातावरणामुळे असे होत असल्याने पालकांनी मुलांची विशेष काळजी घ्यावी.
डॉ. सतीश अष्टेकर,
उपवैद्यकीय अधीक्षक, शासकीय रुग्णालय, सांगली
कोट
संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असलातरी धाेका असणार नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घेतल्यास लहान मुलांना त्रास होणार नाही. -
डॉ. शिशिर मिरगुंडे, बालरोगतज्ज्ञ