माणिकनाळमध्ये बीजप्रक्रिया करून पेरणी करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:16+5:302021-06-06T04:20:16+5:30
संख : माणिकनाळ (ता. जत) येथे खरीप हंगामातील बियाणांच्या उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक कार्यक्रमात तूर, मूग, मका, बाजरी आदी ...
संख : माणिकनाळ (ता. जत) येथे खरीप हंगामातील बियाणांच्या उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक कार्यक्रमात तूर, मूग, मका, बाजरी आदी बियाणांचे दोन क्विंटल बियाणे ‘सीड ट्रीटमेंट ड्रम’मध्ये बीजप्रक्रिया करून देण्यात आले. खरीप हंगामात १०० टक्के बीजप्रक्रिया करून पेरणी करण्याचा गावकऱ्यांनी निर्धार केला.
कृषी विभागाच्या वतीने शंभर टक्के बीजप्रक्रिया मोहीम तालुका कृषी अधिकारी हणमंत मेडीदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शेतकऱ्यांना खरीप हंगामातील बियाणांची उगवण क्षमता प्रत्यक्षिकाद्वारे समजावण्यात आली. बीजप्रक्रियेसंबंधी संपूर्ण माहिती व प्रात्यक्षिक कृषी पर्यवेक्षक एल. एम. कांबळे यांनी दिले. हुमणी कीड नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एकात्मिक कीड नियंत्रण तसेच ५ टक्के निंबोणी अर्क तयार करणे, दशपर्णी अर्क तयार करणे, अंडा आमनो असिड तयार करणे, याविषयी माहिती देण्यात आली. कृषी सहायक संजय कोटी यांंनी जैविक कीडनाशके तयार करणे व रुंद सरी पद्धत, वरंबा पेरणी पद्धतीविषयी माहिती दिली.
यावेळी माजी उपसभापती ॲड. आडव्याप्पा घरेडे, अमसिद्ध घेरडे, जेट्याप्पा घेरडे, महादेव मेडीदार, शिवशंकर मेडीदार, चंदू लमाण, सायबाणा कुंभार, कृर्षी सहायक अनिल उमदी, विजया राठोड, एन. टी. नागणे व शेतकरी उपस्थित होते.
फोटो : ०५ संख १
ओळ : माणिकनाळ (ता. जत) येथे कृषी विभागातर्फे खरीप हंगाम बियाणे उगवण क्षमता चाचणीचे सादरीकरण करण्यात आले.