देवराष्ट्रे गट विकासात अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:30 AM2021-09-14T04:30:45+5:302021-09-14T04:30:45+5:30
फोटो ओळ : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे विकासकामाच्या भूमिपूजनावेळी दिग्विजय कदम, मोहनराव मोरे, प्रकाश मोरे, राहुल मोहिते, प्रमोद ...
फोटो ओळ : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे विकासकामाच्या भूमिपूजनावेळी दिग्विजय कदम, मोहनराव मोरे, प्रकाश मोरे, राहुल मोहिते, प्रमोद गावडे उपस्थित होते.
देवराष्ट्रे : देवराष्ट्रे जिल्हा परिषद गटात कदम कुटुंबाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. विकासात्मक दृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या या परिसराला आमदार मोहनराव कदम, मंत्री विश्वजित कदम यांच्या माध्यमातून निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही युवा नेते दिग्विजय कदम यांनी दिली.
देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे १४ व्या वित्त आयोगामार्फत मंजूर ३५ लाख निधीतून अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गटर बांधणी कामाचे भूमिपूजन दिग्विजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
पंचायत समितीचे माजी उपसभापती मोहन मोरे, सरपंच प्रकाश मोरे, तंटामुक्त अध्यक्ष दिलीप जाधव, राजेंद्र बोगार, दिनकर पवार, आनंदराव मोरे, बापुसो पाटील, राहुल मोहिते, महादेव महिंद उपस्थित होते.