शहरात कत्तलखान्याजवळ उद्यान विकसित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:10+5:302020-12-30T04:35:10+5:30
याबाबत पठाण म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील अनेक खुल्या जागांवर अतिक्रमणे होत आहेत, तर काही खुल्या जागांची परस्परच विक्री होत ...
याबाबत पठाण म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील अनेक खुल्या जागांवर अतिक्रमणे होत आहेत, तर काही खुल्या जागांची परस्परच विक्री होत आहे. या जागा वाचविण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेने खुले भूखंड ताब्यात घेऊन ते विकसित केले पाहिजेत. वार्ड क्र. १५ मध्ये कत्तलखान्याजवळ महापालिकेचा मोठा खुला भूखंड आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा भूखंड पडून आहे. त्यात काटेरी झुडपे, गवत उगविले आहे.
सध्या महापालिकेकडून हरितक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत नव्याने काही उद्याने विकसित केली जात आहेत. वाॅर्ड १५ मध्ये विस्तारित भाग मोठा आहे. शिवाय या परिसरात एकही उद्यान नाही. नागरिकांनी वारंवार उद्यानाची मागणी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने कत्तलखान्याजवळील खुल्या भूखंडात वाॅकिंग ट्रॅक, खेळणी, बगीचा, कारंजे विकसित करावीत, अशी मागणी आयुक्तांकडे केली. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, येत्या दोन दिवसांत जागेची पाहणी करून आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले जाईल, असेही पठाण यांनी सांगितले.