देवेंद्र फडणवीस आज वाळव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:27 AM2021-07-29T04:27:37+5:302021-07-29T04:27:37+5:30
इस्लामपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवार दि. २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता वाळवा ...
इस्लामपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवार दि. २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता वाळवा येथील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी व पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधण्यासाठी येत असल्याची माहिती नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्याचे पूरस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने अद्यापही घोषणेशिवाय काही केलेले नाही. भाजपाशच्या सत्ताकाळात तत्काळ मदत पूरग्रस्तांसाठी देण्यात आली होती. यामुळे या सरकारने जनतेमधील विश्वासार्हता गमावली आहे. दौऱ्यांचा व बैठकांचा फक्त फार्स सुरू आहे. पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपने आवश्यक असणारी प्राथमिक मदत पूरग्रस्तांना पोहाेचविण्यास सुरुवात केली आहे.
वाळवा येथील कैकाडी वस्ती, कुंभार वस्ती, बौद्ध वसाहत याठिकाणी फडणवीस पूरग्रस्तांशी संवाद साधणार आहेत. यावेळी इस्लामपूर विधानसभा भाजपच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना फडणवीस यांच्या हस्ते धान्याचे किट वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रांजली अर्बन बँकेचे अध्यक्ष संदीप सावंत, प्रवीण माने, अक्षय पाटील, विक्रम शिंदे, विलास गावडे, किरण कुंभार उपस्थित होते.