तथागत बुद्धांचा धम्म सामान्यांचे जीवन समृद्ध करणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:28 AM2021-01-25T04:28:16+5:302021-01-25T04:28:16+5:30

इस्लामपूर : सामान्य लोकांचे जीवन समृद्ध करणारा तथागत बुद्धांचा धम्म आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ गतिमान होण्यासाठी सर्वांनी ...

The Dhamma of the Tathagata Buddha enriches the life of the common man | तथागत बुद्धांचा धम्म सामान्यांचे जीवन समृद्ध करणारा

तथागत बुद्धांचा धम्म सामान्यांचे जीवन समृद्ध करणारा

googlenewsNext

इस्लामपूर : सामान्य लोकांचे जीवन समृद्ध करणारा तथागत बुद्धांचा धम्म आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ गतिमान होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. तक्षशीला बौद्धविहार हे विचारांचे, ज्ञानाचे मोठे केंद्र बनेल, असा विश्वास बौद्ध अभ्यासक भंते दीपांकर यांनी व्यक्त केला.

येथील तक्षशीला ज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित बौद्ध धम्म उपासक उपासिका मेळाव्यात ते बोलत होते. प्रकाश कांबळे अध्यक्षस्थानी होते. जितेंद्र व भारती भिलवडीकर यांच्या हस्ते बोधी वृक्षाचे पूजन करण्यात आले. यावेळी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धम्मसेवक उपस्थित होते.

संजय बनसोडे यांनी स्वागत केले. यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल तेजस शिंदे, चित्रकला स्पर्धेत नावीन्यप्राप्त चेतन भाेसले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवल्याबद्दल ऋतुजा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. महेश बनसोडे, प्रा. डॉ. कैलाश सोनवणे, डॉ. क्रांती सावंत, डॉ. जितेंद्र लादे यांचाही गौरव करण्यात आला.

राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील, नगरसेवक विक्रम पाटील, श्यामराव आळतेकर, अशोक कांबळे, अरविंद कांबळे, प्रा. नितीन शिंदे, अवधूत कांबळे, योगेश कुदळे, सचिन कांबळे, अतुल जगताप, कुबेर कांबळे, मनीषा भाेसले, विश्वास कांबळे, प्रा. वसंत भंडारे, जयवंत कांबळे यांची उपस्थिती होते. प्रा. डॉ. अर्जुन पन्हाळे यांनी सूत्रसंचालन केले. नीलिमा कांबळे यांनी आभार मानले.

फोटो - २४०१२०२१-आयएसएलएम- इस्लामपूर न्यूज १

इस्लामपूर येथील तक्षशीला ज्ञानकेंद्राच्या कार्यक्रमात भंते दीपांकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. अर्जुन पन्हाळे, प्रकाश कांबळे, संजय बनसोडे, जितेंद्र भिलवडीकर उपस्थित होते.

Web Title: The Dhamma of the Tathagata Buddha enriches the life of the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.