बुधगावमध्ये दोन गटांत धुमश्चक्री

By admin | Published: December 11, 2014 10:57 PM2014-12-11T22:57:25+5:302014-12-11T23:41:41+5:30

गटातील संघर्ष टोकाला : नंग्या तलवारी, रिव्हॉल्व्हरच्या माध्यमातून गावात दहशत

In Dharmashchari, two groups were organized in Budhgaon | बुधगावमध्ये दोन गटांत धुमश्चक्री

बुधगावमध्ये दोन गटांत धुमश्चक्री

Next

बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथे काल किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर आज दोन गट आमने-सामने आले. शिवप्रेमी व युवा स्वराज्य मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. दोन्ही गटांकडून काठ्या, लोखंडी गज, नंग्या तलवारी, रिव्हॉल्व्हरसह दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. आज एका दुकानावर झालेल्या दगडफेकीत सुमारे २००० रुपयांचे नुकसान झाले.
काल गाडी घासून गेल्याच्या कारणावरून शिवप्रेमी आणि युवा स्वराज्य मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. याचे पर्यवसान मारहाणीत झाले. यानंतर दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते काठ्या, लोखंडी गज घेऊन आमने-सामने आले. गावातील काही मंडळींनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन्ही गटातील संघर्ष मिटला नाही, आज (गुरुवारी) रात्री आठच्या सुमारास गावात पोलीस येऊन गेल्यानंतर दोन्ही गट पुन्हा काठ्या, लोखंडी गज, नंग्या तलवारी, रिव्हॉल्व्हरसह आमने-सामने आले. हा प्रकार पाहून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार नवजीवन चौकात घडला. यावेळी येथील सुकुमार टिंगरे यांचे आदित्य डिस्ट्रिब्युटर्स अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स हे दुकान लोखंडी गजाने फोडण्यात आले. दुकानातील सुमारे दोन हजार रुपयांच्या काच साहित्याचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत हा धुमाकूळ सुरूच होता. सांगली ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर बुधगावमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर कडक कारवाईची जनतेतून मागणी होत आहे. (वार्ताहर)


दोन दिवसापासून गावात तणाव
दोन दिवसांपासून गावातील नवजीवन चौक, वटसावित्री चौक याठिकाणी अंधार पडला की, हजारो युवक गोळा झालेले दिसतात. त्यामुळे गावाबरोबरच परिसरातही या घटनेचे पडसाद उमटत आहेत.
बुधवारी झालेल्या मारामारीत शिवप्रेमी मंडळाच्या कार्यकर्त्याच्या एका दुचाकीचे नुकसान मोठ्याप्रमाणात केले आहे.
दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून लोखंडी गज, नंग्या तलवारी, रिव्हॉल्व्हरसह गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे गावातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दोन्ही गटावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

Web Title: In Dharmashchari, two groups were organized in Budhgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.