सांगलीतील धैर्या भाटेचा मेकअप क्षेत्रात ठसा, जगातील सर्वांत लहान मुलगीचा बहुमान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 04:26 PM2024-01-22T16:26:18+5:302024-01-22T16:28:23+5:30
स्वित्झर्लंड देशातर्फे घेतली जाणारी ही अत्यंत अवघड परीक्षा
सांगली : सांगलीतील अवघ्या दहा वर्षांच्या धैर्या भाटे हीने ‘सीआयडीईएससीओ’ हा आंतरराष्ट्रीय मेकअप मीडिया प्रमाणपत्र मिळवले. स्वित्झर्लंड देशातर्फे घेतली जाणारी ही अत्यंत अवघड अशी परीक्षा आहे. अवघ्या दहाव्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण होणारी धैर्या ही जगातील पहिली मुलगी ठरली आहे.
याबाबत माहिती देताना धैर्याचे आई-वडील अस्मिता भाटे, प्रशांत भाटे म्हणाले, अडीच वर्षांची असल्यापासून धैर्याने मेकअपचे ब्रश हातात घेतले. त्यानंतर या क्षेत्रातील कौशल्ये ती आत्मसात करत गेली. जगातील सर्व देशातील मेकअप क्षेत्रात उच्चकोटीची मानली गेलेली आंतरराष्ट्रीय मेकअप मीडिया प्रमाणपत्र परीक्षा ती उत्तीर्ण झाली.
या परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम १८ वर्षांपुढील व्यक्तींसाठी असतो. वैद्यकीय क्षेत्राशी समकक्ष असा अभ्यासक्रम धैर्याने गेली दोन वर्षे केला. त्यानंतर ती ही परीक्षा उत्तीर्ण झाली. प्रात्यक्षिकांत तिने तीन विभिन्न मेकअप करत लक्ष वेधले. तसेच थेअरीमध्ये ए प्लस मानांकन मिळवत उत्तीर्ण झाली. मलेशियाच्या परीक्षकांनी ही परीक्षा घेतली. ही परीक्षा उत्तीर्ण होणारी धैर्या जगातील सर्वांत लहान मुलगी ठरली आहे.