ढवळेश्वर ग्रामपंचायतीचे समाजहिताला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:24+5:302021-02-12T04:24:24+5:30
ढवळेश्वर ग्रामपंचायतीतर्फे १५ टक्के मागासवर्गीस निधीच्या रकमेतून भांडी व बाकड्यांचे वाटप केले. यावेळी सुहास बाबर बोलत होते. यावेळी उपसरपंच ...
ढवळेश्वर ग्रामपंचायतीतर्फे १५ टक्के मागासवर्गीस निधीच्या रकमेतून भांडी व बाकड्यांचे वाटप केले. यावेळी सुहास बाबर बोलत होते. यावेळी उपसरपंच महादेव किर्दत, माजी उपसरपंच दिलीप किर्दत, राहुल किर्दत, ग्रामसेवक अविनाश खरमाटे उपस्थित होते.
सुहास बाबर म्हणाले, आ. अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखाली ढवळेश्वर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांनी गती घेतली आहे. उद्योजक लक्ष्मण तात्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपसरपंच दिलीप किर्दत यांच्या संकल्पनेनुसार समाजहिताची कामे होत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे.
माजी उपसरपंच दिलीप किर्दत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ग्रा. पं. सदस्य राहुल मंडले, वनिता किर्दत, पुष्पा कारंडे, देवानंद किर्दत, रामदास पाटील, महादेव कारंडे, सचिन कारंडे, शांताराम गायकवाड, निवास गायकवाड, शंकर किर्दत, अस्लम शिकलगार, धनाजी मंडले, पोपट माने, दशरथ काकडे, आनंद निंबाळकर आदी उपस्थित होते.