Sangli: धूम स्टाइलने दागिने हिसकावून पळाले, गाडीवरुन पडल्याने पोलिसांना सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 07:15 PM2023-07-07T19:15:36+5:302023-07-07T19:15:57+5:30

चोरट्यांकडून दुचाकीसह एक लाख वीस हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त

Dhoom Stiles grabs the jewelery and runs away, falling from the car and being found by the police | Sangli: धूम स्टाइलने दागिने हिसकावून पळाले, गाडीवरुन पडल्याने पोलिसांना सापडले

Sangli: धूम स्टाइलने दागिने हिसकावून पळाले, गाडीवरुन पडल्याने पोलिसांना सापडले

googlenewsNext

मिरज : येथील सांगली रस्त्यावर धूम स्टाइलने महिलेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पोबारा करणाऱे नबी अली गरीब हुसेन इराणी (वय २२, रा. अकलूज), जोहीर अब्बास मोहसीन खान (१९, रा. दावणगिरी, कर्नाटक) हे दोघे चोरटे दुचाकी अपघातामुळे गांधी चौक पोलिसांना सापडले. दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चोरलेले मंगळसूत्र हस्तगत केले.

संगीता रामचंद्र बंडगर या गुरुवारी मिरजेतील हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. त्या सांगली रस्त्यावर वंटमुरे कॉर्नर येथून चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत पळ काढला. मंगळसूत्र हातात आल्यानंतर दुचाकीस्वाराने वेगाने दुचाकी चालवली. दोघेही तासगाव रस्त्याने भरधाव वेगात जात असताना ते दुचाकीवरून पडून जखमी झाले. त्यांना नागरिकांनी उपचारासाठी मिरज सिव्हिलमध्ये दाखल केले.

महिलेच्या मंगळसूत्र चोरीप्रकरणी गांधी चाैक पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना चोरट्यांच्या दुचाकीचा क्रमांक मिळाला होता. चोरट्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन त्यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये आणल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांना औषधोपचारानंतर ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरलेले मंगळसूत्रही पोलिसांनी जप्त केले. दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

चोरट्यांकडून दुचाकीसह एक लाख वीस हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. पोलिस उपअधीक्षक अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, धनंजय चव्हाण, अभिजित यमगर, अशरफ मणेर, प्रवीण हुक्कीरे, बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, विकास कांबळे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Dhoom Stiles grabs the jewelery and runs away, falling from the car and being found by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.