इस्लामपुरात वृद्धेच्या गळ्यातील दागिन्यांची धूम स्टाईलने चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:35 AM2021-02-27T04:35:18+5:302021-02-27T04:35:18+5:30

इस्लामपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर फिरण्यासाठी आलेल्या ८४ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे ३ तोळे वजनाचे ...

Dhoom-style theft of jewelery around an old man's neck in Islampur | इस्लामपुरात वृद्धेच्या गळ्यातील दागिन्यांची धूम स्टाईलने चोरी

इस्लामपुरात वृद्धेच्या गळ्यातील दागिन्यांची धूम स्टाईलने चोरी

Next

इस्लामपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर फिरण्यासाठी आलेल्या ८४ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे ३ तोळे वजनाचे दागिने धूम स्टाईलने दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारून पोबारा केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. वृद्धेने या चोरट्यांशी झटापट करीत अर्ध्या तोळ्याचे दागिने वाचविले.

श्रीमती इंदुमती पांडुरंग पाटील (वय ८४, रा. माळ गल्ली, इस्लामपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. २५) सायंकाळी त्या फिरून येण्यासाठी एकट्याच बाहेर पडल्या होत्या. उपजिल्हा रुग्णालयासमोर रस्त्याने चालताना माकडवाले गल्लीसमोरील रस्त्यावरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून हे दोघे चोरटे आले. पाठीमागे बसलेल्या चोरट्याने श्रीमती पाटील यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची मोहनमाळ व एक तोळे वजनाची लिंबोणी मण्याची माळ पकडून हिसडा दिला. यावेळी पाटील यांनी प्रसंगावधान राखत गळ्याला हात लावून दागिने पकडून ठेवले. मात्र या झटापटीत चोरट्यांनी मोहनमाळ आणि लिंबोणी मण्याची अर्धी माळ घेऊन बेघर वसाहतीच्या दिशेने पोबारा केला. श्रीमती पाटील यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आढळून आले नाहीत.

Web Title: Dhoom-style theft of jewelery around an old man's neck in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.