तांदूळवाडी परिसरात पेरणीसाठी बियाणे मिळण्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:56+5:302021-05-25T04:29:56+5:30

तांदूळवाडी, ता. वाळवा परिसरात शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. कृषी दुकाने बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे मिळण्यात ...

Difficulties in getting seeds for sowing in Tandulwadi area | तांदूळवाडी परिसरात पेरणीसाठी बियाणे मिळण्यात अडचणी

तांदूळवाडी परिसरात पेरणीसाठी बियाणे मिळण्यात अडचणी

Next

तांदूळवाडी, ता. वाळवा परिसरात शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. कृषी दुकाने बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे मिळण्यात अडचणी निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कृषी दुकाने दिवसभरासाठी उघडी ठेवण्यासाठी परवानगी मिळावी अथवा बियाणे, खते मिळण्याची व्यवस्था शासनाने करावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी आहे.

कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, भडकंबे, नागाव, कणेगाव, भरतवाडी आदी गावांची शेती वारणा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतीची मशागत करण्यासाठी शेतीला वळीव पावसाची गरज असते, हा पाऊस मागील चार दिवस झाले पडला आहे. शेतकरी समाधानी असून पेरणीपूर्व मशागत करून शेतकरी खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे. काही शेतकरी सोयाबीन पेरणी करण्यात व्यस्त आहे; परंतु सध्या रासायनिक खते आणि बियाणांची शेतकऱ्यांना उपलब्धता होत नाही. सकाळी सात ते अकरा यावेळेत कृषी दुकाने चालू आहेत. यावेळेत दुकान गर्दी होत असल्यामुळे ती सर्वांना मिळत नाहीत. म्हणून शासनाने कृषी दुकान दिवसभर उघडी ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

Web Title: Difficulties in getting seeds for sowing in Tandulwadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.