घाटमाथ्यावर दिघंची-हेरवाड राज्यमार्गाचे काम निकृष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:27 AM2021-04-22T04:27:29+5:302021-04-22T04:27:29+5:30
फोटो ओळी : घाटनांद्रे (ता. कवठेमहंकाळ) येथे दिघंची-हेरवाड राज्य मार्गावर केवळ डांबर हातरण्यात आले आहे. जालिंदर शिंदे घाटनांद्रे : ...
फोटो ओळी : घाटनांद्रे (ता. कवठेमहंकाळ) येथे दिघंची-हेरवाड राज्य मार्गावर केवळ डांबर हातरण्यात आले आहे.
जालिंदर शिंदे
घाटनांद्रे : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या दिघंची-हेरवाड या राज्यमार्गाचे काम घाटमाथ्यावर सुरू आहे. येथे केवळ डांबर फासण्याचे काम सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेली दोन-तीन वर्षांपासून दिघंची-हेरवाड या मार्गाचे काम संथगतीने सुरू होते. हे काम नियोजित वेळत पूर्ण करायचे असल्याने आता कामाने गती घेतली आहे. परंतु हे काम करताना केवळ आहे त्या स्थितीत रस्त्यावर डांबर फासून काम उरकले जात आहे.
घाटमाथ्यावर येणाऱ्या ओढे, नाल्यावरील छोट्यामोठ्या पुलांची कोठेही उंची व रुंदीकरण केल्याचे दिसून येत नाही. तर काही ठिकाणी रस्तारस्त्याचे बांधकाम करताना कोठेही खुदाई करून भराव टाकला जात नाही. केवळ काम उरकण्यावर भर दिला जात आहे. याबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
घाटनांद्रे गावाअंतर्गत एक ते दीड किलोमीटरचे काम केवळ एका तासात आहे. त्या रस्त्यावर केवळ डांबर हातरण्यात आले असून, कुठली खुदाई अथवा भरावाचा कसलाही नावलेशही नाही. केवळ एका तासात काम आटपून यंत्रणा मार्गस्थ झाली.
या भागात काही ठिकाणी या राज्यमार्गाचे काम एवढे निकृष्ठ व पूर्वीच्याच रस्त्याला आहे. त्या स्थितीत केवळ डांबर फासल्याने हा मार्ग राज्य मार्ग असल्याचे वाटतही नाही.
कोट
सध्या हा रस्ता केवळ पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. कोठेही रस्ता बांधकामाच्या दर्जाचा विचार केला जात नाही. मुळात या रस्त्याकडे पाहिले की हा राज्य मार्ग असल्याचे कुठेही जाणवत नाही.
- संतोष शिंदे. घाटनांद्रे