दिघंचीत समाधान मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:36 AM2021-02-27T04:36:07+5:302021-02-27T04:36:07+5:30
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे शुक्रवारी दिघंची हायस्कूलच्या प्रांगणात समाधान मेळावा आयोजित करण्यात होता. या मेळाव्याचे आयोजन प्रांताधिकारी ...
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे शुक्रवारी दिघंची हायस्कूलच्या प्रांगणात समाधान मेळावा आयोजित करण्यात होता. या मेळाव्याचे आयोजन प्रांताधिकारी संतोष भोर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी आटपाडीचे नूतन तहसीलदार सचिन मुळीक, नायब तहसीलदार राजकुमार राठोड, विजय ढेरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यात आरोग्य, महसूल, पुरवठा, सेतू, आगार, शिक्षण, कृषी, पशुवैद्यकीय यासह अन्य विभागांमार्फत नागरिकांना सेवा देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तापमान तपासूनच प्रत्येक व्यक्तीला आत सोडण्यात आले. शुक्रवारी सकाळी दहा ते पाच या वेळेत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रांताधिकारी संतोष भोर म्हणाले, लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांनी जाण्यापेक्षा आम्हीच नागरिकांपर्यंत पोहोचलो. नागरिकांचे प्रलंबित प्रश्न लगेच मार्गी लावू. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हा उपक्रम राबविला असून, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व अधिकारी एकाच छताखाली आणले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे विनायक पवार, सूरज पवार, गटशिक्षणाधिकारी दत्ता मोरे, दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, तलाठी एस. के. कुंभार, ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब होनराव, सागर ढोले. मुन्ना तांबोळी, शिवाजी पुसावळे, भैया तांबोळी, समग्र शिक्षा अभियानचे प्रशांत चंदनशिवे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते