डिजिटल लायब्ररी आष्ट्याच्या वैभवात भर टाकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:33+5:302021-06-18T04:19:33+5:30
फोटो: आष्टा पोलीस ठाणे येथे मंगलादेवी शिंदे यांच्या हस्ते भोजन किट प्रदान करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अजित सिद, ...
फोटो: आष्टा पोलीस ठाणे येथे मंगलादेवी शिंदे यांच्या हस्ते भोजन किट प्रदान करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अजित सिद, चंद्रकांत पाटील, दिलीप शिंदे, मयूर धनवडे, नंदकुमार बसुगडे, शेरनवाब देवळे, संजय सनदी, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : माजी आमदार दिवंगत विलासराव शिंदे यांच्या कार्याची माहिती भावी पिढीला मार्गदर्शक ठरेल. आष्टा-सांगली मार्गावरील अत्याधुनिक डिजिटल लायब्ररी आष्टा शहराच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वैभवात भर घालेल, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष मंगलादेवी शिंदे यांनी केले.
आष्टा येथील विलासराव शिंदे यांच्या निवासस्थानानजीक सुरू करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक डिजिटल लायब्ररीच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. अभियंता चंद्रकांत पाटील, शेर नवाब देवळे, मयूर धनवडे, युवक नेते प्रतीक पाटील, सम्राट महाडिक, शहाजी पाटील, अनिल शिंदे, ॲड. विश्वासराव पाटील, आनंदराव पाटील, शिवाजीराव शिंदे, नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे, अनिल बोंडे, तेजश्री बोंडे, प्रभाकर जाधव, मनीषा जाधव, आदी उपस्थित होते.
दरम्यान, विलासराव शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आष्टा शहरातील विलासराव शिंदे विलगीकरण केंद्र, आष्टा पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय यासह वृद्धाश्रम व परिसरातील सुमारे ५०० गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अजित सिद, संजय सनदी, सचिन मोरे, डॉ. संतोष निगडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.