विटा येथील दिग्विजय गॅस देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:25 AM2021-02-13T04:25:59+5:302021-02-13T04:25:59+5:30
देशमुख म्हणाले, भारत पेट्रोलियमने गॅस एजन्सीच्या गुणवत्ता वाढीसाठी प्लॅटिनिअम, गोल्ड व सिल्व्हर अशा तीन भागात विभागणी केली आहे. प्रत्येक ...
देशमुख म्हणाले, भारत पेट्रोलियमने गॅस एजन्सीच्या गुणवत्ता वाढीसाठी प्लॅटिनिअम, गोल्ड व सिल्व्हर अशा तीन भागात विभागणी केली आहे. प्रत्येक गॅस एजन्सीच्या कामकाजाचे ऑनलाईन निरीक्षण करून त्यानुसार प्रत्येक एजन्सीला गुण दिले जातात. संपूर्ण भारतभर ७ हजारपेक्षा जास्त गॅस एजन्सी कार्यरत आहेत. त्यापैकी २१४ एजन्सीची प्लॅटिनिअममध्ये निवड केली आहे. विटा येथील दिग्विजय गॅस एजन्सीचे ३६५ दिवस कामकाज, २५ वर्षांपासून ग्राहकांना दिलेली तत्पर सेवा, बुकिंगनंतर कमी वेळेत घरपोच गॅस सिलिंडर, सरकारने राबविलेले उपक्रम ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात मिळालेले यश, ग्राहकांची अत्यल्प तक्रार तसेच ऑनलाईन बुकिंग, ऑनलाईन पेमेंट आदी सुविधांचा अभ्यास करून २१४ प्लॅटिनिअम एजन्सीमध्ये दिग्विजय गॅस एजन्सीला ९०.९५ टक्के गुण मिळाल्याने दिग्विजय गॅस एजन्सी देशात पहिली आली आहे. या एजन्सीचा भारत पेट्रोलियमने गौरव केला असल्याचेही उदयसिंह देशमुख यावेळी म्हणाले.
फोटो - १२०२२०२१-विटा-दिग्विजय गॅस : विटा येथील दिग्विजय गॅस एजन्सीला देशात पहिला क्रमांक मिळवून देण्यात या कर्मचाऱ्यांचेही मोठे योगदान आहे.