दिलीपकुमार यांच्या निधनाने मुस्लिम ओबीसींचा आधारवड कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:18 AM2021-07-08T04:18:16+5:302021-07-08T04:18:16+5:30
सांगली : मुस्लिम ओबीसी समाजासाठी अभिनेते दिलीपकुमार यांनी केलेले काम अतुलनीय होते. त्यांच्या निधनाने समाजाच आधारवड कोसळला, अशी भावना ...
सांगली : मुस्लिम ओबीसी समाजासाठी अभिनेते दिलीपकुमार यांनी केलेले काम अतुलनीय होते. त्यांच्या निधनाने समाजाच आधारवड कोसळला, अशी भावना मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष बादशहा पाथरवट यांनी व्यक्त केली.
संघटनेच्यावतीने बुधवारी दिलीपकुमार यांच्या निधनानंतर श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी पाथरवट म्हणाले की, ते जसे सिनेक्षेत्रात सर्वांचे चाहते होते तसे वैयक्तिक जीवनामध्येही आपल्या कार्यामुळे सर्वांचे चाहते होते. विशेषत: सांगली, मिरजेतील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. आपल्या जीवनकाळात त्यांनी दिवंगत माजी आमदार हाफिज धत्तुरे यांच्या प्रचारासाठी १९९९मध्ये मिरजेच्या किसान चौकात, तर तरूण भारत क्रीडांगणात ओ. बी. सी.च्या मेळाव्यासाठी हजेरी लावली होती. सांगलीत हिंदू-मुस्लिम चौकातील मुस्लिम बँकेच्या उद्घाटनालाही ते आले होते. त्यांनी ओ. बी. सी. घटकांसाठी व गरीब लोकांच्या कल्याणासाठी मोठी मदत केली आहे. त्यांच्या जाण्याने ओ. बी. सी. घटकांचा मोठा आधारस्तंभ हरपला आहे. ही पोकळी कधीही भरुन न निघणारी आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कबीर मुजावर, हारून पठाण, मुज्जफर मुजावर, शहानवाज मुल्ला, तोहिद मोमीन, इमाम मुलाणी, अमीर हमजा तांबोळी, यासिन इनामदार, इरफान मुल्ला, मुबारक नदाफ, ऐजाज हुजरे, शफिक इनामदार, रफिक शेख, शाहिद मुजावर, आदी उपस्थित होते.