मृत्युपूर्व जबाबासाठी महिलांची मदत घेणार दिलीप सावंत : दक्षता समितीशी संवाद
By admin | Published: May 9, 2014 12:15 AM2014-05-09T00:15:43+5:302014-05-09T00:15:43+5:30
सांगली : भाजून गंभीर जखमी झालेल्या महिलांचा मृत्युपूर्व जबाब घेण्यासाठी आता दक्षता समितीमधील महिलांची मदत घेतली जाईल, असे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सांगितले.
सांगली : भाजून गंभीर जखमी झालेल्या महिलांचा मृत्युपूर्व जबाब घेण्यासाठी आता दक्षता समितीमधील महिलांची मदत घेतली जाईल, असे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सांगितले. दक्षता समितीमधील महिला, सामाजिक कार्यकर्त्या यांच्याशी सावंत यांनी गुरुवारी संवाद साधला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या चार दिवसांपासून सावंत यांनी जनसंपर्क अभियान सुरु केले. या अभियानांतर्गत त्यांनी व्यापारी, उद्योजक, नागरिक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. गुरुवारी पोलीस मुख्यालयात त्यांनी दक्षता समितीमधील महिला, सामाजिक कार्यकर्त्या यांची बैठक आयोजित केली होती. दोनशेहून अधिक महिला उपस्थित होत्या. कौटुंबिक वादातून महिलांवर होणार्या अत्याचाराला वाचा फोडावी, पीडित महिलांवर होणार्या अत्याचारातील साक्षीदारांना संशयितांकडून धमकी दिली जाते का, याचा दक्षता समितीमधील महिलांनी आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महिलांच्या समस्याही सावंत यांनी जाणून घेतल्या. यावेळी सावंत म्हणाले की, कौटुंबिक वादातून महिला पोलिसांत तक्रार देण्यास आल्यानंतर यामध्ये समेट घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. पीडितावर झालेल्या अत्याचाराच्या न्यायालयात खटले सुरु आहेत. या खटल्यांचे कामकाज सुरळीत सुरु आहे का नाही, याची माहिती घ्यावी. वकील पीडित महिलेची बाजू व्यवस्थित मांडतात का, यावर ‘वॉच’ ठेवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. भाजून जखमी झालेल्या महिलांचा मृत्युपूर्व जबाब घेण्यात तुमची मदत घेतली जाईल. (प्रतिनिधी)