मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनकरराव पाटील
By admin | Published: May 10, 2014 11:48 PM2014-05-10T23:48:55+5:302014-05-10T23:48:55+5:30
सांगली : मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनकरराव पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर निरीक्षकांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सांगली : मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनकरराव पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर निरीक्षकांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मराठा संघाच्या सांगलीतील सांस्कृतिक भवनमध्ये शनिवारी पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत ढवळी (ता. वाळवा) येथील दिनकरराव पाटील यांची मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. पाटील जिल्हा परिषदेकडे अभियंता म्हणून कार्यरत आहेत. निवडीनंतर त्यांचा निरीक्षकांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार ढाणे, डॉ. राजीव चव्हाण निरीक्षक म्हणून उपस्थित होते. मावळते अध्यक्ष काका हालवाई, श्रीरंग पाटील, श्रीनिवास पाटील, शिवाजी पाटील, उत्तमराव माने, संजय देसाई, शिवाजी पाटील, नितीन चव्हाण आदी उपस्थित होते. निरीक्षक नंदकुमार ढाणे म्हणाले की, मराठा सेवा संघाच्या कार्याचा विचार व विस्तार अधिक वेगाने तळागाळात पोहोचविण्याचा निर्णय झाला. यासाठी सामाजिक विचारांची परंपरा व अभिरूची असणार्या सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित करून संघटनेत घेतले जाणार आहे. उत्साही कार्यकर्त्यांना संघाच्या कार्यकारिणीत स्थान दिले जाणार आहे. नूतन अध्यक्षांनी बहुजन समाजाला संघटित करावे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)