शिवजयंतीस सांगलीत दीपोत्सव, लेसर शो, रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:11+5:302021-02-12T04:24:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिवजयंतीच्या विविध कार्यक्रमांसाठी शासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल करावेत, अशी मागणी शिवजन्मोत्सव समितीच्या बैठकीत करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिवजयंतीच्या विविध कार्यक्रमांसाठी शासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल करावेत, अशी मागणी शिवजन्मोत्सव समितीच्या बैठकीत करण्यात आली. कष्टकऱ्यांची दौलत सभागृहात झालेल्या बैठकीत कार्यकर्ते उत्सवासाठी आग्रही होते.
शिवजयंती १९ फेब्रुवारी रोजी आहे. दरवर्षीप्रमाणे १८ फेब्रुवारीला मध्यरात्री १२ वाजता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.
मावळा रॅली, छत्रपती रॅली, छत्रपती शासन रॅली १९ फेब्रुवारी रोजी निघेल. यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे ठरले. देवा ग्रुपतर्फे रात्री ७ ते १० दरम्यान शासनाने लागू केलेले कोरोनाविषयक सर्व नियम पाळून व कोणत्याही प्रकारचा शिस्तभंग न होता सोशल डिस्टन्सिंग पाळून शिवजयंती साजरी करण्याचे ठरले.
बैठकीला सतीश साखळकर, असिफ बावा, प्रशांत भोसले, अभिजित भोसले, डॉ. संजय पाटील, युसूफ मेस्त्री, विश्वजित पाटील, महेश पाटील, किरण कांबळे, युनूस महात, मावळा रॅलीचे ऋषिकेश पाटील, छत्रपती रॅलीचे गणेश चौधरी, छत्रपती शासन रॅलीचे दिग्विजय माळी, कुलदीप देवकुळे, चेतन माडगूळकर, फारूक संगतरास, अमित लाळगे, कॉ. उमेश देशमुख, अशोक कोकलेकर, आदी उपस्थित होते.
चौकट
एक दिवा शिवबासाठी
‘एक दिवा शिवबासाठी’ या संकल्पनेतून दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी संगीतमय कारंजा व लेसर शो आयोजित केला आहे.
या कार्यक्रमांसाठी शासनाने कोरोनाच्या नावाखाली शिवजयंतीवर घातलेले निर्बंध उठवावेत, असे आवाहन समितीने केले.
-------------