इंटरनॅशनल स्कूलचे संचालक मोहन माळी यांना अटक
By हणमंत पाटील | Published: January 31, 2024 10:02 AM2024-01-31T10:02:43+5:302024-01-31T10:02:53+5:30
जातीवाचक बोलून तिचा अपमान केला आहे, अशी संबंधित तरुणीने फिर्याद दिली आहे.
कवठेमहांकाळ: अथणी तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय तरुणीशी अश्चिल वर्तन करून जातीवाचक शब्द वापरल्याबद्दल कवठेमहांकाळ तालुक्यातील मोहन माळी बोअरवेलचे मालक व अलकुड एस येथे असलेल्या मोहन माळी इंटरनॅशनल स्कुलचे संस्था चालक मोहन शिवलिंग माळी (वय ४२, रा.कवठेमहांकाळ) यांच्यावर कवठेमहांकाळ पोलिसांनी विनयभंग व ओट्रोसिटीचा गुन्हा मंगळवारी रात्री उशिरा दाखल केला. संशयित आरोपी मोहन माळी यांना पोलिसांनीअटक केली आहे.
पोलिसांनी माहिती दिली. ते म्हणाले, ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कवठेमहांकाळ येथे नवीन बसस्थानकच्या समोर असलेल्या मोहन माळी बोअरवेल्स कार्यालयात फिर्यादी तरुणीस कामास होती. त्या तरुणीशी अश्लिल हावभाव करून व अश्लिल व्हिडीओ दाखवले. तरुणीशी अश्चिल वर्तन केले. तसेच जातीवाचक बोलून तिचा अपमान केला आहे, अशी संबंधित तरुणीने फिर्याद दिली आहे.
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात माळी यांच्यावर विनयभंग व अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी माळी यास अटक केली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळुंखे करीत आहेत. एका शैक्षणिक संस्था चालकांवर अश्या प्रकारचे कृत्ये केल्याने या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सहका-यांवरही गुन्हा दाखलची मागणी
सदर गुन्ह्यातील पीडित तरुणी मोहन मोळी बोअरवेल्स कार्यालयात काम करीत होती. त्या तरुणीच्या असहायतेचा फायदा घेऊन तीच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित तरुणीस न्याय मिळाला पाहिजे, तसेच माळी यास मदत करणारे त्याचे सहकारी यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक विशाल वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.