तरुणांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कौशल्ये विकसित करणे गरजेचे : व्ही. एन. सुपनेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:19+5:302021-06-19T04:18:19+5:30

रामानंदनगर येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामार्फत आयोजित ऑनलाईन व्याख्यानामध्ये ते बोलत होते. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम अध्यक्षस्थानी होते. ...

Disaster management skills need to be developed in youth: V. N. Supnekar | तरुणांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कौशल्ये विकसित करणे गरजेचे : व्ही. एन. सुपनेकर

तरुणांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कौशल्ये विकसित करणे गरजेचे : व्ही. एन. सुपनेकर

Next

रामानंदनगर येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामार्फत आयोजित ऑनलाईन व्याख्यानामध्ये ते बोलत होते. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम अध्यक्षस्थानी होते. कर्नल व्ही. एन. सुपनेकर म्हणाले, ''संकटकाळामध्ये केवळ अज्ञानामुळे तरुणांना अपघातग्रस्तांना मदत करता येत नाही. आपत्ती काळात संकटात सापडलेल्या व्यक्तिला आपण कशा पद्धतीने मदत करायला पाहिजे, याबाबतचे कोणतेही शिक्षण आपल्याकडे शाळा, महाविद्यालयांमध्ये दिले जात नाही. ज्यामुळे आपल्या राष्ट्राचे दिसून न येणारे पण प्रचंड मोठे नुकसान होते. त्यामुळे तरुणांनी अशा प्रकारची प्रशिक्षणे आत्मसात करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट संदेश दौंडे यांनी स्वागत केले. डॉ. तेजस चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. धनेश गवारे यांनी आभार मानले.

Web Title: Disaster management skills need to be developed in youth: V. N. Supnekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.