कोयना धरणातून 38,631 क्युसेस पाण्याचा विसर्ग, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 02:04 PM2021-09-13T14:04:00+5:302021-09-13T14:04:22+5:30
वारणा धरणातून 8 हजार 205 क्युसेस पाण्याचा विसर्ग
सांगली - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अपेक्षित आहे. कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 13 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून 38 हजार 631 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. सध्या आयर्विन पुलाची पाणी पातळी 11 फूट इतकी असून त्यामध्ये वाढ होवून उद्या 14 सप्टेबर 2021 रोजी साधारणपणे 25 फूटापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. अफवांवर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
सध्यस्थितीतीत धरणातील पाणीसाठा व विसर्गाचा माहिती पुढीलप्रमाणे- कोयना धरण आजचा पाणीसाठा 104.49 धरण भरलेली टक्केवारी 99.28, विसर्ग (क्युसेस) 38631, वारणा धरण आजचा पाणीसाठा 34.36 धरण भरलेली टक्केवारी 99.88, विसर्ग (क्युसेस) 8205, धोम धरण आजचा पाणीसाठा 12.41 धरण भरलेली टक्केवारी 91.93, विसर्ग (क्युसेस)620, कन्हेर धरण आजचा पाणीसाठा 9.70 धरण भरलेली टक्केवारी 96.04, विसर्ग (क्युसेस)24, उरमोडी धरण आजचा पाणीसाठा 8.75 धरण भरलेली टक्केवारी 87.85, विसर्ग (क्युसेस) 300, तारळी धरण आजचा पाणीसाठा 5.54 धरण भरलेली टक्केवारी 94.70, विसर्ग (क्युसेस)3103 धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहील्यास धरणामधील आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233/2301820,2302925 या क्रमांकावर संपर्क साधावा.