‘वारणा’, ‘कोयना’ धरणांतून विसर्ग सुरू; ‘कृष्णे’ची पातळी २७ फुटांवर स्थिर, सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

By अशोक डोंबाळे | Published: July 23, 2024 03:42 PM2024-07-23T15:42:07+5:302024-07-23T15:42:26+5:30

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Discharge from Varana', Koyna dams started; Level of Krishna river stable at 27 feet, rain continues in Sangli district | ‘वारणा’, ‘कोयना’ धरणांतून विसर्ग सुरू; ‘कृष्णे’ची पातळी २७ फुटांवर स्थिर, सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

‘वारणा’, ‘कोयना’ धरणांतून विसर्ग सुरू; ‘कृष्णे’ची पातळी २७ फुटांवर स्थिर, सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

सांगली : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस असून २४ तासांत कोयना धरण येथे १६४, तर नवजा येथे १४५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले; तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून एक हजार ५० क्युसेक पाणी सोडले आहे; तसेच वारणा (चांदोली) धरण ८२.५१ टक्के भरले असून मंगळवारी दुपारपासून धरणाचे चार वक्राकार दरवाजे उचलून दोन हजार १५२ क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून एक हजार ६४८ कयुसेक असा एकूण तीन हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे ‘वारणा’, ‘कृष्णा’ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. सांगली आर्यविन येथे कृष्णेची पाणीपातळी २७ फुटांना स्थिर आहे.

कृष्णा नदीची आजची पाणी स्थिती

पाणीपातळी फूट इंचामध्ये
कृष्णा पूल कराड - १४.८
बहे पूल - ९
ताकारी पूल - २७
भिलवडी पूल - २८.४
आर्यविन - २७
राजापूर बंधारा - ४१.५
राजाराम बंधारा - ४०.८

जिल्ह्यात १२.१ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १२.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज १२.१ (३५५), जत २ (२५७.८), खानापूर ८.९ (२८५.१), वाळवा १७.३ (५३५.७), तासगाव ८.९ (३५०.१), शिराळा ३१ (७५३.१), आटपाडी १.४ (२२९.७), कवठेमहांकाळ ४.७ (३४४.७), पलूस १३.४ (३७१.५), कडेगाव १५.५ (३६०.५).

धरणातील पाणीसाठा

धरण - आज पाणीसाठा - एकूण पाणीसाठा
कोयना - ६४.५५ - १०५.२५
धोम - ६.६३  - १३.५०
कन्हेर - ६.११  - १०.१०
वारणा - २८.१५ - ३४.४०
दूधगंगा - १६.७२ - २५.४०
राधानगरी - ७.३६ - ८.३६
तुळशी - २.६२ - ३.४७
कासारी - २.०४ - २.७७
पाटगाव - ३.२६ - ३.७२
धोम-बलकवडी - २.०३ - ४.०८
उरमोडी - ४.१० - ९.९७
तारळी - ३.४२ - ५.८५
अलमट्टी - ९१.८३ - १२३.०८

Web Title: Discharge from Varana', Koyna dams started; Level of Krishna river stable at 27 feet, rain continues in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.