शेतीपंपासाठी नवीन वीजकनेक्शन देणे बंद : शेतकरी वर्गातून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:57 PM2019-04-01T22:57:13+5:302019-04-01T22:59:03+5:30
प्रताप महाडिक । कडेगाव : महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून नवीन शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी पैसे भरून घेणे बंद ...
प्रताप महाडिक ।
कडेगाव : महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून नवीन शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देणे बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या अजब कारभारामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतात विहिरी खोदून पाईपलाईन केल्या आहेत, परंतु आता वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे हे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. याला महावितरणचे चुकीचे धोरण कारणीभूत ठरत आहे. महावितरणने नवीन वीज कनेक्शन देणे बंद केले आहे. यामुळे कर्जबाजारी झालेले हजारो शेतकरी देशोधडीला लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
शासनाने वीज कनेक्शन देणे बंद करून सौर कृषी पंपाचा पर्याय ठेवला आहे. यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांशी शेतकºयांनी सौरप्रणाली नको, आम्हाला महावितरणकडून वीज कनेक्शन हवे, अशी मागणी केली आहे.
३१ मार्च २०१८ पूर्वी ज्या शेतकºयांनी वीज कनेक्शनसाठी पैसे भरले आहेत, त्यामधील ज्या शेतकºयांची प्रकरणे मंजूर झालेली आहेत, त्या शेतकºयांना आता नवीन वीज कनेक्शन देणे बंद करून उच्च दाब वितरण प्रणाली ‘एचव्हीडीएस’अंतर्गत स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरचा पर्याय दिला आहे.
या प्रणालीतून एक किंवा दोन शेतकºयांसाठी स्वतंत्र रोहित्र (डीपी) बसवून थेट रोहित्रावरूनच कृषीपंपाला जोडणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ज्या शेतकºयांनी शेती पंपाच्या वीज कनेक्शनसाठी पाच ते सहा वर्षांपासून पैसे भरले आहेत, त्यांना अद्यापही बरीच जोडणी बाकी असल्याने शेतकºयांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
महावितरणच्या या गलथान कारभाराविरोधात अनेकदा आंदोलने झाली, निवेदन देण्यात आली; मात्र महावितरण कंपनीने उपलब्ध साधनसामग्री आणि सुविधा, उपलब्ध वीज आणि लागणारी वीज आणि महत्त्वाचे म्हणजे नवनिर्मितीसाठी येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याचे कारण दाखवून नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज घेणे बंद केले आहे, असे अधिकारी सांगत आहेत.
शासनाने यापुढे सौरऊर्जेवर भर देण्याचे ठरवल्याने यापुढे आता सौरऊर्जेवरील पंप देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकºयांना दिवसा वीज मिळेल आणि विजेचा वापरही नियंत्रणात राहील, असे सांगितले जाते. परंतु तलावांमध्ये पाणीपातळी कमी-जास्त होत असल्यामुळे पाणी उचलण्याचे परवाने घेऊन ज्यांनी पाईपलाईन केली आहे, त्या शेतकºयांना एकाच ठिकाणी स्थिर राहणारी सौर कृषी पंप प्रणाली बसविणे अडचणीचे होणार आहे. शासनाने सौर कृषी पंप आणि पारंपरिक वीज कनेक्शन दोन्ही पर्याय शेतकºयांसमोर ठेवले पाहिजेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतकºयांची गळचेपी : थांबवावी
गेल्या वर्षापासून शेतकºयांना नवीन वीज जोडणीसाठी प्रस्ताव घेण्याचे काम बंद आहे. शासनाने आता सौरऊर्जेबाबत कार्यवाही सुरू केली. २०१८ पूर्वीच्या मंजूर प्रकरणांसाठी उच्चदाब विद्युत प्रणालीतून शेतकºयांना थेट जोडणी देण्याचा निर्णयही झाला, पण त्याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. शासनाने शेतकºयांची गळचेपी थांबवाबी, असे कडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांनी सांगितले.