पोपटासारखी चोच, आटपाडीच्या ३१ लाखांच्या बकऱ्याचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 06:21 PM2022-05-16T18:21:42+5:302022-05-16T18:29:57+5:30

आकर्षक व जातिवंत असणारे माडग्याळ जातीच्या एवढ्या दोन महिने वय असलेल्या ३१ लाख रुपयांची मागणी

Discussion of 31 lakh goats of Atpadi | पोपटासारखी चोच, आटपाडीच्या ३१ लाखांच्या बकऱ्याचीच चर्चा

पोपटासारखी चोच, आटपाडीच्या ३१ लाखांच्या बकऱ्याचीच चर्चा

googlenewsNext

आटपाडी : आटपाडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ३१ लाखांच्या बकऱ्याचीच जास्त चर्चा रंगली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना या बकऱ्याची पाहणी करत मालकासह बकऱ्याचा सन्मान केला आहे.

आकर्षक व जातिवंत असणारे माडग्याळ जातीच्या एवढ्या दोन महिने वय असलेल्या ३१ लाख रुपयांची मागणी झाली आहे. या बकऱ्याचा सन्मान शेतकरी मेळाव्यात करण्यात आला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, नितीन बानुगडे पाटील यांना या बकऱ्याचे कुतूहल निर्माण झाले.

तोंड व नाकाचा विशिष्ट आकार

आटपाडी दुष्काळी तालुका असला तरी जातिवंत खिलार गाय, बैल यासह शेळ्या - मेंढ्या यासाठी प्रसिद्ध आहे. माडग्याळ जातीच्या मेंढ्यांना मागील काही वर्षांपासून प्रसिद्धी मिळाली आहे. इतर मेंढ्यांपेक्षा वेगळी ठेवण, सुंदर दिसणारे तोंड व नाकाचा आकार विशिष्ट असल्याने या मेंढ्याना बाजारात खूप मागणी आहे.



पोटच्या मुलापेक्षा ही चांगल्या पद्धतीने सांभाळ

अनेक शेतकरी पशुपालकासाठी या मेंढीला आपल्या पोटच्या मुलापेक्षा ही चांगल्या पद्धतीने सांभाळतात. त्याची निगा राखत आहेत. अशाच आटपाडीतील सुबराव पाटील, विलास पाटील या शेतकऱ्यांनी दोन महिने वय असलेले बकऱ्याचे संगोपन केले आहे.

बघ्यांची मोठी गर्दी

माडग्याळ जातीच्या या बकऱ्याला बघायला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. माडग्याळ जातीच्या मेंढ्यांना मागील काही वर्षांपासून प्रसिद्धी मिळाली आहे. पोपटासारखी चोच असणारा हा बोकड दिसायला अतिशय सुंदर आणि देखणा दिसतो.

Web Title: Discussion of 31 lakh goats of Atpadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली