जादा टक्केवारीच्या परिणामांवर राजकीय वर्तुळात रंगताहेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:13 PM2019-04-24T23:13:22+5:302019-04-24T23:13:27+5:30

सांगली : मतदान वाढीसाठी चालविलेले प्रशासकीय अभियान, उमेदवारांमधील जोरदार चुरस यांचा सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदान वाढीवर अपेक्षेपेक्षा कमी परिणाम ...

Discussion in the political circles on the outcome of excess percentage | जादा टक्केवारीच्या परिणामांवर राजकीय वर्तुळात रंगताहेत चर्चा

जादा टक्केवारीच्या परिणामांवर राजकीय वर्तुळात रंगताहेत चर्चा

Next

सांगली : मतदान वाढीसाठी चालविलेले प्रशासकीय अभियान, उमेदवारांमधील जोरदार चुरस यांचा सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदान वाढीवर अपेक्षेपेक्षा कमी परिणाम झाला. तरीही २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा दोन टक्क्यांनी मतदानात वाढ झाली असून, वाढलेल्या टक्क्याचा नेमका कोणावर, किती परिणाम होणार, याचे तर्कवितर्क करीत मतदारसंघात चर्चा रंगल्या आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघात यंदा प्रशासनाने प्रभावी मोहीम राबवित मतदान वाढीसाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर तुल्यबळ उमेदवार, त्यांच्या माध्यमातून निर्माण झालेली चुरस, दिग्गज नेत्यांच्या सभांनी तापलेले वातावरण याचा परिणाम मतदान वाढीवर मोठ्या प्रमाणावर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा कमी मतदान वाढ झाल्याचे चित्र मंगळवारी समोर आले. सांगली लोकसभा मतदारसंघात यंदा १८ लाख ३ हजार ५४ मतदार होते. यातील ११ लाख ७८ हजार ८१४ इतके मतदान मंगळवारी झाले. याची टक्केवारी ६५.३८ इतकी होते. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ६३.४७ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मतदान वाढले असले तरी, ही वाढ अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येते.
वाढलेली टक्केवारी आता कोणाच्या राजकीय जीवनावर कितपत परिणाम करणारी ठरणार, मताधिक्याचे गणित कसे बदलणार, किती मतदान मिळाले तर उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, अशा एक ना अनेक प्रश्नांभोवती चर्चा रंगल्या आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात आता महिनाभर या चर्चा सुरू राहणार आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात आजअखेर सर्वाधिक मतदान १९९९ मध्ये ६८.४७ टक्के इतके नोंदले गेले होते. हा विक्रम अजूनही अबाधित आहे.
भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज भाजप नेत्यांच्या सभा ज्या तासगाव मतदारसंघात झाल्या, तेथेच मतदानाची आकडेवारी घटल्याचे दिसत आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात सर्वाधिक चुरस जाणवत असतानाही, येथील टक्का घसरल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

Web Title: Discussion in the political circles on the outcome of excess percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.