कवठेमहांकाळ तालुक्यात रोगामुळे मका पिकाला धोका, उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 06:19 PM2022-07-28T18:19:44+5:302022-07-28T18:20:10+5:30

तीन महिन्यात उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे हुकमी पीक आहे. मात्र गत काही वर्षात लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Disease threat to maize crop in Kavathemahankal taluka | कवठेमहांकाळ तालुक्यात रोगामुळे मका पिकाला धोका, उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती

कवठेमहांकाळ तालुक्यात रोगामुळे मका पिकाला धोका, उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती

googlenewsNext

महेश देसाई

शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यात खरीप हंगामात सर्वाधिक मका पिकाचे उत्पन्न घेतले जाते. सध्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात शेतकरी हे मका पिक मोठ्या प्रमाणात घेतात. तीन महिन्यात उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे हुकमी पीक आहे. मात्र गत काही वर्षात लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औषध फवारणी करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे.    
     
लष्करी अळींमुले पिकांची वाढ खुंटते, यामुळे उत्पादनावर परिणाम होत असून कृषी विभागातर्फे योग्य त्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

सर्व कृषी सहाय्य्क, मंडळ अधिकारी सर्व कर्मचारी लष्करी अळी या रोगाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे तालुका कृषी अधिकारी एम. जे. तोडकर यांनी सांगितले.

Web Title: Disease threat to maize crop in Kavathemahankal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.