माडग्याळमध्ये अतिक्रमणांमुळे गावाचे विद्रुपीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:34 AM2021-02-27T04:34:11+5:302021-02-27T04:34:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क माडग्याळ : माडग्याळ (ता. जत) येथील अतिक्रमणधारकांनी सर्व सीमा पार केल्या. गावाचे विद्रुपीकरण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कारवाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
माडग्याळ
: माडग्याळ (ता. जत) येथील अतिक्रमणधारकांनी सर्व सीमा पार केल्या. गावाचे विद्रुपीकरण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कारवाई सुरू असतानाच बाजार चोैकातील झेंड्यासमाेर नवे खोके ठेवण्यात आल्याने संताप व्यत्त होत आहे.
तालुक्यातील सर्वाधिक अतिक्रमणामुळे विद्रुपीकरण झालेले गाव म्हणून माडग्याळ प्रसिद्ध आहे. गावातील एकही चौक, रस्ता बिगर अतिक्रमणाचा राहिलेला नाही. एसटी पिकअप शेड, ग्रामपंचायतीने उभारलेल्या व्यापारी संकुलासमाेरही अतिक्रमण आहे. गावात खाेक्याबराेबर काही नागरिकांनी रस्ते, माेकळी जागा बांधकामे करून गिळंकृत केली आहे.
गावातून जाणाऱ्या जत-सोलापूर रस्त्याचे रुंदीकरण केल्याने काही प्रमाणात अतिक्रमण हटविण्यात आली आहेत; परंतु अद्यापही वाहतुकीला अडथळा होणारी अतिक्रमणे कायम आहेत. गावातील व्यापारी संकुल, एसटी पिकअप शेड, सरकारी रुग्णालय परिसर खोक्यांनी व्यापून टाकले आहे. मुख्य रस्ता, धर्मशाळा, बाजारपेठ, मुख्य झेंडा कट्टा येथे खोक्यांमुळे जागा गायब झाल्या आहेत.
चाैकट
उपोषणाचा इशारा
ग्रामपंचायतीला मोकळी जागाच उरली नसल्याने वाहने रस्त्यावरच उभी असतात. यामुळे अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होते. याचा त्रास सामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. येत्या आठ दिवसांत गावातील सर्व अतिक्रमणे न हटविल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे.