वसंतदादा बँकेच्या अवसायनावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 04:35 PM2020-01-03T16:35:13+5:302020-01-03T16:36:13+5:30

वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अवसायनाची मुदत दोन महिन्यात संपणार असून वाढीव मुदतीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसली तरी, यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसहकार सेनेने, अवसायन प्रक्रियेस मुदतवाढ न घेण्याचा डाव आखल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार मंत्र्यांकडे केली आहे.

Dispute over Vasantdada Bank entity | वसंतदादा बँकेच्या अवसायनावरून वाद

वसंतदादा बँकेच्या अवसायनावरून वाद

Next
ठळक मुद्देवसंतदादा बँकेच्या अवसायनावरून वादमुदतवाढ न घेण्याचा डाव आखल्याची तक्रार

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अवसायनाची मुदत दोन महिन्यात संपणार असून वाढीव मुदतीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसली तरी, यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसहकार सेनेने, अवसायन प्रक्रियेस मुदतवाढ न घेण्याचा डाव आखल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकार मंत्र्यांकडे केली आहे.

नियमबाह्य कर्जवाटप, संचालकांचा मनमानी कारभार, इमारतींवर केलेला अवाढव्य खर्च, राजकारण्यांना दिलेली बेकायदेशीर कर्जे यामुळे बॅँकेचा तोटा वाढत गेला आणि बॅँक बंद पडली. बॅँकेच्या सांगलीसह राज्यात ३६ शाखा होत्या. बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणे मुश्किल झाले.

याबाबतच्या तक्रारींनंतर रिझर्व्ह बँकेने तत्कालीन सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांच्या अहवालानंतर २६ जून २००८ रोजी रिझर्व्ह बॅँकेने बँकेवर आर्थिक निर्बंध घातले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात ७ जानेवारी २००९ रोजी या बँकेचा बॅँकिंग परवाना रिझर्व्ह बॅँकेने रद्द केला व १६ फेब्रुवारी २00९ रोजी बॅँकेवर अवसायक मंडळ आले. अवसायनाचा हा कालावधी १0 वर्षांचा होता. तो १६ फेब्रुवारी २0१९ रोजी संपल्यानंतर अवसायनाची मुदत वर्षाने वाढविण्यात आली. आता ही मुदत फेब्रुवारी २0२0 मध्ये संपुष्टात येणार आहे.

वसंतदादा बँकेच्या अवसायनाची मुदत संपुष्टात येऊन पुन्हा मुदतवाढ मिळू नये, म्हणून डाव आखला गेल्याची तक्रार शिवसहकार सेनेने शासनाकडे केली आहे. या संघटनेचे जिल्हा संघटक प्रदीप बर्गे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अवसायन प्रक्रियेस पुन्हा मुदतवाढ मिळू नये म्हणून तत्कालीन संचालक, बुडवे कर्जदार, काही वरिष्ठ अधिकारी प्रयत्नशील आहेत.

सध्याचे अवसायक निळकंठ करे यांनी बँकेच्या मालमत्तेचा लिलाव लावलेला आहे. तो बेकायदेशीर आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती पाहता, सुमारे १६0 कोटी रुपयांची कर्ज वसुली होऊन, चौकशी सुरू असलेल्या नियमबाह्य कर्ज प्रकरणांतील २४७ कोटी वसूल होणे गरजेचे आहे.

Web Title: Dispute over Vasantdada Bank entity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.