जतमधील शिक्षकांच्या खासगी क्लासेसबाबत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:24 AM2021-03-20T04:24:04+5:302021-03-20T04:24:04+5:30

माडग्याळ : जत येथील सरकारी पगार घेऊनही खासगी क्लासेस चालविणाऱ्या शिक्षकांवर तत्काळ कारवाई करा अन्यथा तीव्र आंदेलन छेडू असा ...

Dissatisfied with the private classes of teachers in Jat | जतमधील शिक्षकांच्या खासगी क्लासेसबाबत नाराजी

जतमधील शिक्षकांच्या खासगी क्लासेसबाबत नाराजी

Next

माडग्याळ

: जत येथील सरकारी पगार घेऊनही खासगी क्लासेस चालविणाऱ्या शिक्षकांवर तत्काळ कारवाई करा अन्यथा तीव्र आंदेलन छेडू असा इशारा विद्यार्थी पालकानी दिला आहे.

जत येथील काही शिक्षक सरकारचा गलेलट्ट पगार घेतात. तरीही ते त्याच शाळेतील विद्यार्थांना विविध आमिषे व भीती दाखवून त्यांनी शाळेबाहेर सुरू केलेल्या खासगी क्लासला येण्यासाठी आग्रह धरतात. क्लासला प्रवेश न घेतल्यास प्रॅक्टिकलच्या गुणांची भीती व आमिषे दाखवून आपल्या क्लासेसकडे विद्यार्थांना वळविण्याचा प्रयत्न करतात. काही गरीब विध्यार्थी सध्या घरातच बसून अभ्यास करण्याचे ठरविले असले तरी या विद्यार्थ्यांना या शिक्षकाकडून प्रॅक्टिकल मार्काची भीती वाटत आहे. गोरगरीब विद्यार्थांना लुटणाऱ्या शिक्षकावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा पालकांनी दिला आहे.

Web Title: Dissatisfied with the private classes of teachers in Jat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.