सांगलीच्या स्टेशनरोडवर सांडपाण्याचा लोंढा, परिसरात दुर्गंधी पसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 04:09 PM2019-01-30T16:09:04+5:302019-01-30T16:11:35+5:30
सांगलीच्या स्टेशन रोडवरील दक्षिण बाजूस असलेल्या गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरुन वहात राजवाडा परिसरापर्यंत जात आहे. संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
सांगली : सांगलीच्या स्टेशन रोडवरील दक्षिण बाजूस असलेल्या गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरुन वहात राजवाडा परिसरापर्यंत जात आहे. संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
वारंवार या पारिसरात ड्रेनेज तुंबत असल्याने सांडपाण्याचा प्रश्न येथील नागरिकांची डोकेदुखी बनली आहे. महापालिका प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सतिश साखळकर व कार्यकर्त्त्यंंनी भेट देऊन पाहणी केली.
याच परिसरात उत्तर बाजूस असलेल्या गटारीत बीएसएनएल कार्यालयाने झाडांच्या फांद्या व कचरा टाकला होता. तो हटविण्याच्या सूचना साखळकर यांनी दिल्या. त्यानंतर गटार प्रवाहीत झाली, मात्र स्टेशन रोडवरील ड्रेनेज दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही.