विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ५ हजार ब्लॅंकेटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:31 AM2021-01-16T04:31:18+5:302021-01-16T04:31:18+5:30

सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वजितेश फाऊंडेशनच्या वतीने पलूस, कडेगाव तालुक्यांसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ...

Distribution of 5,000 blankets on the occasion of Vishwajit Kadam's birthday | विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ५ हजार ब्लॅंकेटचे वाटप

विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ५ हजार ब्लॅंकेटचे वाटप

googlenewsNext

सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वजितेश फाऊंडेशनच्या वतीने पलूस, कडेगाव तालुक्यांसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीत गारठणाऱ्या, गोरगरीब, बेघर आणि गरजू लोकांना जवळपास

५ हजार ब्लँकेटचे वाटप करून मायेची ऊब देण्यात आली.

युवा नेते डॉ. जितेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा आदर्शवत उपक्रम राबविण्यात आला.

ज्यांना घर आहे, जे आर्थिकदृष्ट्या सधन आहेत, अशा व्यक्ती कडाक्याच्या थंडीत उबदार कपड्याने स्वतःचे संरक्षण करतात. मात्र, ज्यांना निवारा नाही. ज्यांना पुरेसे वस्त्र नाहीत, जे रस्त्याच्या कडेला उघड्यावर जीवन व्यतीत करतात. रस्त्याच्या कडेला उघड्यावर थंडीच्या कडाक्यात वास्तव्य करतात, बसस्थानकात व परिरसरात रात्र काढतात, कडाक्याच्या थंडीत

भल्या पहाटे ऊसतोडी करण्यासाठी जातात त्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे, त्यांना मायेची ऊब मिळावी यासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आल्याचे फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यानी यावेळी सांगितले. फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पलूस आणि कडेगाव तालुक्यांत गावोगावी तसेच सांगली व मिरज शहरात तसेच विटा शहर व खानापूर तालुक्यात विविध ठिकाणी जाऊन कडाक्याच्या थंडीत गारठणाऱ्या

लोकांना ब्लॅंकेट दिली. या स्तुत्य उपक्रमाचे

सर्वत्र कौतुक होत आहे.

चौकट : "दातृत्वाची परंपरा "

माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी गोरगरीब जनतेसाठी दातृत्वाची परंपरा सुरू केली. पित्याचा हा दातृत्वाचा गुण पुत्र विश्वजित कदम यांच्या नेतृत्वातही अधिक बहरून येत आहे. आमदार मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कदम कुटुंबीय व कार्यकर्त्यांनीही

ही परंपरा अविरतपणे जोपासली आहे.

फोटो : १५ कडेगाव १

ओळ : कडेगाव येथील गोरगरीब लोकांना ब्लॅंकेट वाटप करताना विश्वजितेश फाऊंडेशनचे कार्यकर्ते.

Web Title: Distribution of 5,000 blankets on the occasion of Vishwajit Kadam's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.