विश्वास कारखान्यामार्फत अपघातग्रस्त बैलगाडीमालकांना धनादेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:27+5:302021-05-29T04:21:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या २०२०-२१ गळीत हंगामत ज्या बैलगाडीवानांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या २०२०-२१ गळीत हंगामत ज्या बैलगाडीवानांनी करार केले होते. ज्यांच्या बैलगाडीस अपघात होऊन बैलास इजा अथवा बैल मयत झाला, त्यांना विम्याचे धनादेश वाटप करण्यात आले.
कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांच्या हस्ते धनादेश बैलगाडीवानांना देण्यात आले. यामध्ये विठ्ठल पाटील व प्रवीण पाटील (दोघे शिराळे खुर्द), आनंदा खोत (लादेवाडी) यांच्या बैलांचा पाय मोडला म्हणून प्रत्येकी २२ हजार ५०० रुपये, तर संदीप अशोक दळवी (थेरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांचा बैल मयत झाला म्हणून ३७ हजार ५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी युवा नेते विराज नाईक, दिनकरराव पाटील, सुरेश पाटील, मानसिंग पाटील, बाळासाहेब पाटील, विजयराव नलवडे, विश्वास कदम, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, बिरुदेव आमरे, यशवंत दळवी, तानाजी वानरे, विश्वास पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील आदी उपस्थित होते.