संस्कार उद्योग समूहाच्या वतीने अंध अपंगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:25 AM2021-05-15T04:25:53+5:302021-05-15T04:25:53+5:30
आष्टा पोलीस ठाणे येथे गोरगरीब, अंध, अपंगांना जीवनावश्यक वस्तूंचे किट प्रदान करताना पोलीस निरीक्षक अजित सीद, उद्योजक रवींद्र पाटील, ...
आष्टा पोलीस ठाणे येथे गोरगरीब, अंध, अपंगांना जीवनावश्यक वस्तूंचे किट प्रदान करताना पोलीस निरीक्षक अजित सीद, उद्योजक रवींद्र पाटील, मनोज सुतार, संजय सनदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील उद्योजक रवींद्र पाटील यांच्या संस्कार उद्योग समुहाच्यावतीने आष्टा शहरातील गोरगरीब, अंध, अपंग नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट पोलीस ठाणे या ठिकाणी वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक अजित सीद, सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुतार, उदय देसाई, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक सदामते, संजय सनदी, राजेंद्र पाटील, भाट, जंगम, भरत पाटील यांच्यासह सहकारी उपस्थित होते.
अजित सीद म्हणाले, आष्टा शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. समाजातील विविध सामाजिक संस्था पदाधिकारी यांनी गोरगरिबांना मदत करणे गरजेचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे.
रवींद्र पाटील म्हणाले, जलसंपदामंत्री जयंत पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार उद्योग समूह प्रगती करत आहे. गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू दिल्या असून, भविष्यातही त्यांना मदत करणार आहोत. यावेळी पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.