इन्साफ फाऊंडेशनतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:58+5:302021-06-03T04:18:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील इन्साफ फाऊंडेशन व सावली बेघर निवारा केंद्रातर्फे अडीच हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील इन्साफ फाऊंडेशन व सावली बेघर निवारा केंद्रातर्फे अडीच हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यापैकी १,३०० किट रिलायन्स फाऊंडेशनने देऊ केले.
लॉकडाऊन काळात उपासमार होत असलेल्या गरजूंना मदतीसाठी इन्साफ फाऊंडेशनचे अध्यक्ष मुस्तफा मुजावर आणि सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला. सांगली, मिरजेसह जत, कवठेमहांकाळ, डफळापूर, विटा, तासगाव, इस्लामपूर, कवलापूर, बुधगाव, माधवनगर परिसरात वाटप झाले. आणखी तीन हजार कुटुंबांना वाटप केले जाणार असल्याचे मुजावर यांनी सांगितले. उपक्रमात इन्साफ फाऊंडेशनचे निखिल शिंदे, रफीक मुजावर, रेहमत मुजावर, प्रसाद रिसवडे, श्रीकांत कुंभार, सतीश भोसले, नितीन पाटील, धनंजय वाघ, नितेश बसागरे, सचिन कदम, स्वप्निल शिंदे, मुसा समडोळे, मुदस्सर बागवान यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाग घेतला.