मनसेकडून धान्य, भाजीपाल्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:56+5:302021-05-20T04:28:56+5:30
घरपोच सेवेतील दुकानाची यादी जाहीर सांगली : लाॅकडाऊनच्या काळात किराणा माल घरपोच करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेने वार्डनिहाय ...
घरपोच सेवेतील दुकानाची यादी जाहीर
सांगली : लाॅकडाऊनच्या काळात किराणा माल घरपोच करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेने वार्डनिहाय दुकानांची यादी तयार करून ती प्रसिद्ध केली आहे. नागरिकांनी संबंधित दुकानदारांशी संपर्क साधून किराणा माल घरपोच मागवून घ्यावा, असे आवाहन केले आहे.
-----------
शामरावनगरला नवीन पाईपलाईन
सांगली : शामरावनगरमधील जहीर मस्जिद परिसरात अनेक वर्षांपासून जलवाहिनी नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागत होती. नगरसेविका नसीमा नाईक, रज्जाक नाईक यांनी पाठपुरावा करून नवीन जलवाहिनीचे काम मंजूर केले. या कामाला सुरूवात झाल्याने या परिसरातील पाणीप्रश्न निकाली निघणार आहे.
----------
रुग्ण व नातेवाइकांसाठी मोफत जेवण व्यवस्था
सांगली : सुरेश (बापू) आवटी युवा मंचकडून मिरज परिसरातील कोविड रुग्ण व नातेवाइकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा उपक्रम सुरेश आवटी, स्थायीचे माजी सभापती संदीप आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, महेश पाटील, सुनील मोतुगडे, नितीन आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
-----------
शामरावनगरला पावसाळी पाणी निचऱ्याचे काम
सांगली : प्रभाग क्रमांक १८ मधील शामरावनगर परिसरातील पावसाळी पाण्याचा निचऱ्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या. या कामाची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, स्नेहल सावंत, महेंद्र सावंत, अभिजित भोसले, रज्जाक नाईक उपस्थित होते.
--------