सुखायू प्रतिष्ठानतर्फे कर्णबधीर मुलांना श्रवणयंत्रांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:25 AM2021-03-05T04:25:46+5:302021-03-05T04:25:46+5:30
ओळी :- सुखायु जन्मजात व्याधी प्रतिबंध व सहाय्य प्रतिष्ठानतर्फे कर्णबधीर मुलांना डाॅ. रवींद्र ताटे यांच्या हस्ते श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात ...
ओळी :- सुखायु जन्मजात व्याधी प्रतिबंध व सहाय्य प्रतिष्ठानतर्फे कर्णबधीर मुलांना डाॅ. रवींद्र ताटे यांच्या हस्ते श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी डाॅ. संज्योत पाटील, नरेंद्र दीक्षित, डाॅ. नंदिनी निकम उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जागतिक जन्मजात व्याधी दिनानिमित्त सांगली येथील सुखायू जन्मजात व्याधी प्रतिबंध व सहाय्य प्रतिष्ठानतर्फे कर्णबधीर मुलांना श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक जन्मजात व्याधी दिन आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने सांगलीतील सुखायू जन्मजात व्याधी प्रतिबंध व सहाय्य प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन डायग्नोस्टीक सेंटर येथे करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र ताटे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते तीन जन्मजात व्याधीग्रस्त कर्णबधीर बालकांना श्रवणयंत्र प्रदान करण्यात आले. तसेच संस्थेच्या अधिकृत सोशलमीडिया पेजचे औपचारिक उद्घाटन झाले. संस्थेमार्फत कर्णबधीर व्यक्तींना त्यांच्या मास्क व वाहनावर चिकटविण्यासाठी विशिष्ट अशा स्टीकरचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सभासद व त्यांच्या पालकांना ॲनिमिया व आहार या विषयावर डॉ. आशाराणी पाटील यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. मानव राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संज्योत पाटील व्याधीग्रस्त व्यक्तींंच्या समस्यांबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र दीक्षित, उपाध्यक्ष डॉ. नंदिनी निकम व सर्व विश्वस्त उपस्थित होते.