मिरजेत पोलीस ठाण्यात मास्क व सॅनिटायझर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:25 AM2021-05-24T04:25:52+5:302021-05-24T04:25:52+5:30
मिरज : मिरज शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड मिरज शाखेतर्फे मास्क व सॅनिटायझर ...
मिरज : मिरज शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड मिरज शाखेतर्फे मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. कोरोना साथीच्या काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिरज शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात क्रेडिट एक्सेस मिरज शाखेतर्फे मास्क सॅनिटायझर , फेस शिल्ड, थर्मामीटर वाटप करण्यात आले. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, हिरा चव्हाण, दशरथ कदम, राजेश भोरे, नजीर रोहिले उपस्थित होते.
---------
राष्ट्र सेवा दलाचे वृक्षारोपण
मिरज -राष्ट्र सेवा दलाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. बार्शी येथील न्यायाधीश जावेद झारी, डाॅ. सोमनाथ मगदूम, डाॅ. संजय माने, डाॅ. जी.आर.पालकर, राष्ट्र सेवा दलाचे सदाशिव मगदूम, रामलिंग तोडकर, रोहित शिंदे, दिनकर आदाटे, रमेश हेगाणे, शिवानंद हिप्परगी, विजयेंद्र हरपनहळी, किरण कांबळे, मिलिंद कांबळे, प्रसाद पवार, विजय मगदूम, सतीश शेरबंदे उपस्थित होते. ४ जून रोजी कोरोना योद्ध्यांचा सत्कार व वृक्षारोपण मोहिमेचा समारोप करण्यात येणार असल्याचे राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटक सदाशिव मगदूम यांनी सांगितले.