जिल्ह्यात नॅनोयुरियाचे वितरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:37+5:302021-07-23T04:17:37+5:30
इफ्कोच्या नॅनोयुरियाचे वितरण कृषी अधीक्षक विवेक कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. एम.एस. पोवार, रणजित देसाई, शशिकांत पुरमवार ...
इफ्कोच्या नॅनोयुरियाचे वितरण कृषी अधीक्षक विवेक कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. एम.एस. पोवार, रणजित देसाई, शशिकांत पुरमवार
आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : इफ्कोने शेतकऱ्यांसाठी संशोधित केलेल्या नॅनोयुरियाचे वितरण जिल्ह्यात सुरू झाले आहे. गुरुवारी कानडवाडी (ता. मिरज) येथे कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला.
यावेळी वितरण व्यवस्थापक डॉ. एम.एस, पोवार, रणजित देसाई, शशिकांत पुरमवार, मनोज उळाड्डे, कल्याण पाटील, अजित संकपाळ, महेश कोळपे, पी.के. गौड, गणपत चौधरी, संजय निलावर आदींची उपस्थिती होती. डॉ. पोवार यांनी नॅनोयुरियाच्या वापरासंबंधी मार्गदर्शन केले. याच्या वापराने मातीची होणारी हानी टळेल, असे ते म्हणाले. इफ्कोने अत्याधुनिक तंत्राद्वारे द्राव्य स्वरूपातील युरिया उपलब्ध केला आहे. एक गोणी भरून युरिया द्रव स्वरूपात अवघ्या एका बाटलीत सामावतो. पिकांना पाणी पाजताना त्याचा वापर करता येतो.