महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:27 AM2021-05-26T04:27:35+5:302021-05-26T04:27:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या साडेआठशे स्वच्छता कर्मचाऱ्यांना मंगळवारी सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. पुण्यातील अल्ट्रान कंपनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या साडेआठशे स्वच्छता कर्मचाऱ्यांना मंगळवारी सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. पुण्यातील अल्ट्रान कंपनी आणि कॅम फाउंडेशनकडून हे किट देण्यात आले.
महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना शहरातील रस्ते, गटारी, नाले तसेच मोकळ्या प्लॉटमधील झाडे-झुडपे कचरा आदी ठिकाणी स्वच्छता करताना शारीरिक आणि आरोग्य सुरक्षा म्हणून गमबूट, मास्क, हातमोजे आदी साहित्याची गरज असते. स्वच्छता कर्मचाऱ्यांना हे साहित्य मिळावे याबाबत अनेक वेळा चर्चाही झाल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची ही गरज ओळखून पुण्यातील अल्ट्रान कंपनी आणि कॅम फाउंडेशनकडून सुरक्षा किट देण्यात आले आहे.
महापालिकेच्या ८४० स्वच्छता कर्मचाऱ्यांना हे किट देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरक्षा किट वाटप केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये प्रभाग एकच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना या सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रत्येकास गम बूट, हातमोजे, सॅनिटायझर, हॅण्डवॉश तसेच मास्क असे साहित्य देण्यात आले आहे. पुढील चार दिवस प्रभाग निहाय वाटप केले जाणार आहे. यावेळी अल्ट्रान कंपनी आणि कॅम फाउंडेशन पुणेचे सुनील पवार, राकेश पवार, महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक ए. यु. बारगीर, प्रणिल माने, वैभव कुदळे, किशोर काळे, धनंजय कांबळे आदी उपस्थित होते.