दहशतवाद्यांवरील हल्ल्यानंतर साखर वाटप
By admin | Published: September 30, 2016 01:03 AM2016-09-30T01:03:17+5:302016-09-30T01:29:46+5:30
भारतीय सैन्याच्या या कृतीच्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मारुती चौकात गुरुवारी सायंकाळी आनंद व्यक्त केला
सांगली : पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय लष्कराने केलेल्या हल्ल्यानंतर सांगलीच्या मारुती चौकात आणि राजवाडा चौकात गुरुवारी सायंकाळी साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. राष्ट्रप्रेमी नागरिकांच्यावतीने यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भारतीय सैन्याच्या या कृतीच्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मारुती चौकात गुरुवारी सायंकाळी आनंद व्यक्त केला. ‘हमसे जो टकरायेगा मिट्टी में मिल जायेगा’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ ‘भारत माता की जय’, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सचिन पवार म्हणाले की, पाकिस्तान वारंवार आतंकवादी पाठवून भारतविरोधी कारवाया करीत आहे. याला भारतीय सैन्याने आज चोख उत्तर दिले आहे. यापुढील काळात पुन्हा पाकिस्तानने असा प्रयत्न केला तर, भारतीय सैन्य त्यास चांगलेच प्रत्युत्तर देईल, याची खात्री आहे. यावेळी अंकुश जाधव, श्रीधर कदम, विशाल चव्हाण, अजित कबाडे, मंगेश तांदळे, महेश स्वामी, राजेंद्र शहापुरे, प्रकाश निकम उपस्थित होते. मनसेच्यावतीनेही माजी आमदार नितीन शिंदे, स्वाती शिंदे यांनी राजवाडा चौकात साखर वाटप केले. (प्रतिनिधी)