शून्य रुपयाचे वीजबिल झाले दुरूस्त-ग्राहकाला वितरित : तांत्रिक चूक झाल्याचा महावितरणचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:11 PM2018-06-04T23:11:50+5:302018-06-04T23:12:35+5:30

Distribution of zero rupee electricity bill to the assured customer: Disclosures of MSEDCL for making technical mistake | शून्य रुपयाचे वीजबिल झाले दुरूस्त-ग्राहकाला वितरित : तांत्रिक चूक झाल्याचा महावितरणचा खुलासा

शून्य रुपयाचे वीजबिल झाले दुरूस्त-ग्राहकाला वितरित : तांत्रिक चूक झाल्याचा महावितरणचा खुलासा

Next

सांगली : सांगलीतील एका वीज ग्राहकाला शून्य रुपयाच्या वीज बिलामहावितरणकडून १० रुपयांचा दंड आणि विलंब आकार लावला होता. या प्रश्नावर माध्यमातून बातमी प्रसिध्द होताच सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘त्या’ वीज बिलात दुरुस्ती करुन दि. ४ जून २०१८ रोजी संबंधित वीज ग्राहकास बिलाची पावती पोहोच केली.
तांत्रिक कारणांमुळे शून्य रुपयाच्या वीज बिलास १० रुपये दंड आणि विलंब आकार लागल्याचा खुलासा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

राहुल वारद हे महावितरणच्या विश्रामबाग (सांगली) उपविभागाचे वाणिज्य ग्राहक आहेत. मागील सहा महिन्यांपासून वारद त्यांचे बिल आगाऊ भरत आहेत. त्यामुळे त्यांना येणारे वीज बिल वजा रकमेचे येत होते. मे महिन्यात त्यांना ९९ युनिटच्या वीज वापरापोटी १२२२.२६ रुपये इतके वीजबिल आकारण्यात आले. परंतु वारद यांची १२२३.०८ रुपये रक्कम महावितरणकडे शिल्लक होती. त्यामुळे वीज देय रक्कम शून्य आली.
चालू महिन्याचे वीजबिल व महावितरणकडे ग्राहकाची असलेली शिल्लक/आगाऊ रक्कम यात एक रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक असल्यामुळे देयक रक्कम शून्य आली आहे.

दंडही झाला शून्य
तांत्रिक चुकीमुळे त्याठिकाणी १० रुपये दाखविण्यात आली. त्याची दुरूस्ती सुधारित बिलामध्ये करण्यात आली असून, ग्राहकाला नव्याने सुपूर्द केलेल्या वीज बिलावर सर्व रकमा शून्य करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने यंत्रणेतही सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे महावितरण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Distribution of zero rupee electricity bill to the assured customer: Disclosures of MSEDCL for making technical mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.