जिल्ह्यात ९२१ नवे कोरोना रुग्ण, १२१० जणांची मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:42+5:302021-06-09T04:32:42+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी स्थिर राहिली. दिवसभरात ९२१ नवे रुग्ण आढळून आले असून २५ जणांचा कोरोनाने ...

In the district, 921 new corona patients, 1210 died | जिल्ह्यात ९२१ नवे कोरोना रुग्ण, १२१० जणांची मात

जिल्ह्यात ९२१ नवे कोरोना रुग्ण, १२१० जणांची मात

Next

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी स्थिर राहिली. दिवसभरात ९२१ नवे रुग्ण आढळून आले असून २५ जणांचा कोरोनाने बळी घेतला. तर १२१० जणांनी कोरोनावर मात केली. म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून, दिवसभरात आठ नवे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरू असली तरी रुग्णसंख्येत फारसा फरक पडलेला नाही. गेल्या दोन महिन्यातील सर्वात कमी रुग्णांची नोंद रविवारी झाली होती. पण पुन्हा सोमवारी रुग्णसंख्येत वाढ झाली. मंगळवारी ९२१ जणांना कोरोनाचे निदान झाले. जिल्ह्यातील २५ व परजिल्ह्यातील ५ अशा ३० जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली १, मिरज ३, वाळवा, शिराळा, जत तालुक्यात प्रत्येकी ३, कवठेमहांकाळ, कडेगाव, पलूस तालुक्यात प्रत्येकी १, खानापूर ५, मिरज व तासगाव तालुक्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाने सोमवारी चाचण्यांचे प्रमाण वाढवताना आरटीपीसीआर अंतर्गत २५७१ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ३३२ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ४५१२ जणांच्या नमुने तपासणीतून ६१३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

उपचार घेत असलेल्या ९ हजार १५० रुग्णांपैकी १४१० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ११४७ जण ऑक्सिजनवर, तर २३४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील २४ जण उपचारासाठी दाखल झाले आहेत.

चौकट

म्युकरमायकोसिसचे रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी ८ जणांचे निदान झाले असून एकूण बाधितांची संख्या २२६ वर पोहोचली आहे.आतापर्यंत म्युकरमायकोसिसने १३ जणांचा बळी घेतला आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १२५५३६

उपचार घेत असलेले ९१५०

कोरोनामुक्त झालेले ११२७६४

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३६२२

पॉझिटिव्हिटी रेट १२.८४

सोमवारी दिवसभरात

सांगली ७३

मिरज ५२

वाळवा २१८

मिरज तालुका ११५

कडेगाव ८४

खानापूर ५९

शिराळा ७५

पलूस ५८

जत ४६

कवठेमहांकाळ ३५

तासगाव ६६

आटपाडी ४०

Web Title: In the district, 921 new corona patients, 1210 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.