कृष्णा, कोयना, वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, एनडीआरएफचे दोन पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 14:24 IST2020-08-17T14:20:57+5:302020-08-17T14:24:42+5:30
कृष्णा,कोयना,वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रमुख धरणामधून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आर्यविन पूल येथे पाणी पातळी वाढली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये एनडीआरएफचे दोन पथक दाखल झाले असून एक पथक आष्टा येथे व एक सांगली येथे तयारीत ठेवण्यात आलेले आहे.

कृष्णा, कोयना, वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, एनडीआरएफचे दोन पथक दाखल
सांगली : कृष्णा,कोयना,वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रमुख धरणामधून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आर्यविन पूल येथे पाणी पातळी वाढली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये एनडीआरएफचे दोन पथक दाखल झाले असून एक पथक आष्टा येथे व एक सांगली येथे तयारीत ठेवण्यात आलेले आहे.
नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील नदीकाठावरील व सखल भागातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे खबरदारीची उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये एनडीआरएफचे दोन पथक दाखल झाले असून एक पथक आष्टा येथे व एक सांगली येथे तयारीत ठेवण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यातबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.
सद्यस्थितीत नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष क्रमांक 1077 व 0233-2600500 व पाटबंधारे नियंत्रण कक्ष 0233-2301820/2302925 वरती संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी सतर्क रहावे
कृष्णा,कोयना,वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 6 वा कृष्णा नदीची आर्यविन पूल येथे पाणी पातळी 27.10 फुट इतकी होती.
सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रमुख धरणामधून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे दिनांक 17 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत कृष्णा नदीची आर्यविन पूलाची पाणीपातळी अंदाजे 38 ते 40 फुट इतकी होण्याची शक्यता आहे.
नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे असे आवहन सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ना. शं. करे यांनी केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, वेळोवेळी अद्यावत माहिती कळविण्यात येईल असे त्यांनी कळविले आहे.