जिल्हा बँकेच्या २५ लाखांच्या लुटीचा छडा; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:31 AM2019-11-22T00:31:45+5:302019-11-22T00:31:54+5:30

तासगाव : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या विसापूर शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून २५ लाखांची रोकड लंपास करण्याची घटना १२ ...

District Bank robbery worth Rs 3 lakh; Both arrested | जिल्हा बँकेच्या २५ लाखांच्या लुटीचा छडा; दोघांना अटक

जिल्हा बँकेच्या २५ लाखांच्या लुटीचा छडा; दोघांना अटक

Next

तासगाव : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या विसापूर शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून २५ लाखांची रोकड लंपास करण्याची घटना १२ जून रोजी जिरवळमळा (विसापूर, ता. तासगाव) येथे घडली होती. याप्रकरणी चार महिन्यांनंतर तासगाव पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जिल्हा बँकेचा लिपिक शैलेश शिवाजी गायकवाड (रा. बुधगाव, ता. मिरज) आणि सादिक ताजुद्दीन शेख (रा. गार्डी, मूळ गाव इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणातील आणखी दोन-तीन संशयित पंजाब येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक पंजाबला पोहोचले आहे.
याबाबत माहिती अशी, १२ जून रोजी जिल्हा बँकेच्या विसापूर शाखेचे दोन कर्मचारी तासगाव येथे बँकेच्या मुख्य शाखेत रोकड नेण्यासाठी आले होते. पोत्यात २५ लाखांची रक्कम भरून ती दुचाकीवर ठेवून नेत असताना,जिरवळ मळ्याजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी धक्काबुक्की करून, डोळ्यात चटणी टाकून रक्कम लंपास केली. तासगाव तालुक्यात पहिल्यांदाच दिवसाढवळ्या इतक्या मोठ्या रकमेच्या लुटीची घटना घडली होती. संशयितांचे रेखाचित्र वगळता कोणताही ठोस पुरावा पोलिसांकडे नव्हता.
चार महिन्यांपासून पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्याकडून तपास सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलच्या सीडीआर रिपोर्टवरून या चोरीच्या संशयाची सुई हातनूर शाखेतील जिल्हा बॅँकेचा कर्मचारी शैलेश गायकवाडवर गेली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर उलगडा झाला. त्यानंतर चोरीत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सादिक शेख यालाही ताब्यात घेतले. दोघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अन्य संशयित पंजाबमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक पंजाबमध्ये पोहोचले आहे.
असा झाला उलगडा
घटनेदिवशी जिल्हा बॅँकेच्या तासगाव शाखेतील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता; मात्र बाजार समितीच्या आवारातील सीसीटीव्ही सुरू होता. बँकेपासून विसापूर शाखेपर्यंतचे उपलब्ध असणारे सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. चोरीवेळी बॅँकेचे लोकेशन असणाºया १०५ मोबाईल संभाषणाचे सीडीआर फुटेज तपासण्यातआले. त्यामध्ये संशयित शैलेश गायकवाड याचा समावेश होता. चोरीची घटना घडली, त्यावेळी गायकवाडच्या मोबाईलवरून १७ वेळा फोन झाला होता. याच संशयावरून त्याला ताब्यात घेतले. तो त्यावेळी हातनूर शाखेत लिपिक म्हणून कार्यरत होता. चोरीच्या घटनेवेळी तो तासगावच्या मुख्य शाखेत दोन हजार रुपयांची नोट बदलण्याच्या बहाण्याने आला होता.
मार्चमध्ये रेकी; मेहुण्याचा सहभाग
मार्च महिन्यात शैलेश गायकवाड, अन्य एका कर्मचाºयासोबत हातनूर शाखेसाठी तासगाव शाखेतून दहा लाखांची रक्कम घेऊन निघाला होता. त्यावेळी शैलेशचा गार्डी येथील मेहुणा वाटेत भेटला होता. इतकी मोठी रक्कम कशी घेऊन जाता, अशी विचारणा करून त्याने रेकी केली होती. नंतर याच मेहुण्याने साथीदारासमवेत २५ लाखांवर डल्ला मारून पंजाबला पलायन केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

Web Title: District Bank robbery worth Rs 3 lakh; Both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.