जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे ६३ कोटींच्या कर्जास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:15 AM2017-07-27T01:15:30+5:302017-07-27T01:17:02+5:30

District Central Bank 63 crores loan sanctioned | जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे ६३ कोटींच्या कर्जास मंजुरी

जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे ६३ कोटींच्या कर्जास मंजुरी

Next
ठळक मुद्देकाही महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा करण्यात आला आहे.दिग्गज संचालकांची अनुपस्थिती गत बैठकीतील वादाचे पडसाद या बैठकीत उमटले नाहीत.

कार्यकारी समिती सभा : आठ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा बॅँकेच्या कार्यकारी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत शेती आणि बिगरशेतीच्या ६३ कोटी ९२ लाख ७५ हजार रुपयांच्या कर्जांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये विविध प्रकारच्या पीक कर्जांच्या सुमारे ८ कोटींच्या प्रकरणांचा समावेश आहे, अशी माहिती बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, जिल्हा बॅँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने यावर्षीही कर्जपुरवठ्याचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार टप्प्या-टप्प्याने आता कर्जप्रकरणांना मंजुरी देण्यात येत आहे. शेती आणि बिगरशेतीची अनेक प्रकरणे बुधवारच्या सभेपुढे प्रस्तावित केली होती. या प्रकरणांचा अभ्यास करून त्यांना मान्यता देण्यात आली. बिगरशेतीची एकूण ५५ कोटी २८ लाख ६४ हजार रुपयांची कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये ९ सभासदांना थेट कर्जपुरवठ्याच्या माध्यमातून ३६ कोटी २७ लाख ६० हजार रुपये, पगारदार नोकर असलेल्या ३४ जणांना २ कोटी ४८ लाख ८० हजार रुपये, शेतकरी घरबांधणीअंतर्गत ७ सभासदांना ५२ लाख रुपये, वाहन खरेदीसाठी ८ सभासदांना २७ लाख ६८ हजार रुपये, १५ बॅँक सेवकांना १ कोटी ६ लाख ५६ हजार रुपये, शैक्षणिकसाठी एका सभासदास २० लाख, पगारदार दोन संस्थांसाठी १४ कोटी, एका पाणीपुरवठा संस्थेस ६ लाख आणि लघुउद्योगासाठी एका सभासदास ४0 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
शेतीकर्जाअंतर्गत एकूण ८ कोटी ६४ लाख ११ हजार रुपयांची प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये द्राक्षबाग उभारणी व ठिबक सिंचनसाठी ५८ सभासदांना ९२ लाख ५१ हजार, मध्यम मुदत व दीर्घ मुदत शेती कर्जप्रकरणाअंतर्गत ४१८ सभासदांना ७ कोटी १० लाख ५५ हजार रुपये, ४३ बचत गटांना ४२ लाख ३० हजार रुपये आणि ट्रॅक्टर, स्प्रेर्इंग सिस्टिम यंत्र खरेदीसाठी एका सभासदास १८ लाख ७५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा करण्यात आला आहे.


दिग्गज संचालकांची अनुपस्थिती कार्यकारी समितीच्या बैठकीला आ. मोहनराव कदम, जि. प. अध्यक्ष व बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खा. संजयकाका पाटील अनुपस्थित होते. त्यामुळे गत बैठकीतील वादाचे पडसाद या बैठकीत उमटले नाहीत.

Web Title: District Central Bank 63 crores loan sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.